Pune metro | पुणे मेट्रोने प्रवास करताना नागरिकांनो या गोष्टींचे पालन जरुर करा; मेट्रो प्रशासनाने जारी केल्या सूचना

मेट्रो सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी खुली करण्यात आली आहे. मेट्रो प्रवासाचा आनंद घेत असताना या प्रवासाच्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याबरोबरच मेट्रो प्रशासनाने मेट्रोच्या प्रवासाचे वेळापत्रकही प्रसिद्ध केलं आहे.

Pune metro | पुणे मेट्रोने प्रवास करताना नागरिकांनो या गोष्टींचे पालन जरुर करा; मेट्रो प्रशासनाने जारी केल्या सूचना
Pune metro
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 3:44 PM

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. उदघाटनानंतर मेट्रो (Metro) सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी खुली करण्यात आली आहे. मेट्रो प्रवासाचा आनंद घेत असताना या प्रवासाच्या नियमावलीचे (Metro Travel rule) पालन करणे आवश्यक असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याबरोबरच मेट्रो प्रशासनाने मेट्रोच्या प्रवासाचे वेळापत्रकही प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये मेट्रोचे मार्ग व तिकीट दाराची माहिती देण्यात आली आहे.  पुणे आणि पिंपरीत दिवसभरात एकूण 13 तास मेट्रो धावणार असून, दार अर्ध्या तासाला मेट्रोची फेरी असणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दुपारी तीननंतर सर्वसामान्य नागरिकांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. तसेच सात मार्चपासून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दर अर्ध्या तासाने धावणार आहे.

हे करा

  • मेट्रोतून प्रवास करताना प्रवाश्यांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायची आहे.
  • प्रवास करताना रांगेत यावे. मेट्रो प्रवासात दृष्टीहीन प्रवाश्यांसाठी बनवण्यात आलेला मार्ग मोकळा ठेवावा, जेणे करून या प्रवाश्यांना प्रवास करणे सोपे जाईल.
  • मेट्रोतून प्रवास करताना प्रवाश्याच्या जवळ 25 किलो इतकेच सामन नेता येईल. सामानाच्या वजनाची मर्यादा घालून दिली आहे. (सामना 25  किलो पेक्षा अधिक वजनाचे नसावे.सामना 60 सेमी लांब45  सेमी रुंद व 25  सेमी उंच असावे.
  • फलाटवर असलेल्या पिवळ्या रेषेच्या पलीकडे उभे राहावे.
  • प्रवास करताना महिला, मुले, दिव्यांग ,जेष्ठ नागरिकांना मार्ग मोकळा करून देऊन सहकार्य करावे.
  • स्थानकावर , फलाटावर गरज लागल्यास त तेथील सुरक्षा रक्षक, ग्राहक मंद केंद्राशी संपर्क साधा

हे करू नका

  • मेट्रोतून प्रवास करताना कचरा करु नका.
  • मेट्रो ट्रॅकवर पाऊल टाकू नका.
  • बंदुके, शस्त्र , दारुगोळा बाळगू नका.
  • ट्रेनचे दरवाजे जबरदस्तीने उघण्याचा प्रयत्न करू नका.
  • रेल्वे प्रवासात पाळीव प्राणी बाळगू नका.
  • तिकिटाविना प्रवास करण्याचा प्रयत्न करू नका.
  • मेट्रो स्थानकांचे विद्रुपीकरण करू नका.
  • तुम्ही जरा दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक नसाल तर लिफ्टचा वापर करू नका.
  • मद्यपान व नियम तोडण्यास प्रतिबंध आहे.
  • स्थानक व ट्रेनच्या आता खाद्यपदार्थाचा वापर करू नका.
  • अश्या सूचना मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Video | विमानाचं लॅन्डिंग तर नीटनेटकं झालं, पण लॅन्ड झाल्यानंतर रनवे सोडून भलतीकडे कसं काय घुसलं?

दौरा पंतप्रधान मोदींचा, गुजगोष्टी फडणवीस-अजित दादांच्या अन् चर्चा राजकीय गोडव्याची!

Rabi Season: कडधान्याचे पीक गतवर्षी साधले यंदा नेमके काय झाले? पीक पध्दतीमध्ये बदल करुनही निराशाच

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.