ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्या! मुख्यमंत्र्यांच्या परिवहन खात्याला सूचना, फोनवरुन एकनाथ शिंदे यांचे आदेश

DA News : एसटी कर्मचारी संघटनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महागाई भत्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर शुक्रवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले.

ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्या! मुख्यमंत्र्यांच्या परिवहन खात्याला सूचना, फोनवरुन एकनाथ शिंदे यांचे आदेश
एसटी बसImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 6:45 AM

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांसाठी (Maharashtra State Transport Employee) मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देणार असून तशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या. परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह यांना फोनवरून कर्मचाऱ्यांचे डीए (Dearness Allowance) देण्याचे आदेश देण्यात आलेत. एसटी कर्मचारी संघटनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महागाई भत्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर शुक्रवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले. महागाई भत्ता देण्याचं आश्वासन देण्यात आलं असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. त्यामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलाास मिळणार आहे. तसंच वाढत्या महागाईत आर्थिक मदतीचा हातभारही लागेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

वेगवेगळ्या मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संप पुकारला होता. त्यातील एसटीचं विलिनीकरण केलं जावं, ही प्रमुख मागणी एसटी कामगार संघटनांनी केली होती. तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात एसटीच्या संपावर तोडगा काढण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासोबत त्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. मात्र विलिनीकरणाची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली नव्हती. मात्र संपावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली गेली होती.

हे सुद्धा वाचा

एसटी कर्मचाऱ्यांना 28% डीए

28 ऑक्टोबर 2021 रोजी अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. सध्याच्या घडीला सरकारप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के इतका महागाई भत्ता दिला जातो. 28 ऑगस्ट रोजी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी महागाई भत्त्यामध्ये वाढ करत एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा केली होती.

दरम्यान, आता काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनाद्वारे काही मागण्या करण्यात आल्या होत्या. महागाई भत्ता देण्यात यावा, हजारो एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन निश्चित केलं जावं, यांसोबतच वेगवेगळ्या मागण्यांवर लक्ष वेधण्यात आलं होतं. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देण्याबाबतच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.