12वी बोर्डाच्या निकालावरच कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे प्रवेश, उदय सामंतांची माहिती; इंजिनिअरिंग, एलएलबीची सीईटी कधी होणार?
12 वी बोर्डाच्या निकालावरच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्रवेश होणार आहेत. तर व्यावसायिक आणि पारंपरकि अभ्यासक्रमाच्या सीईटीचे धोरण जाहीर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
पुणे : 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील प्रवेशाबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केलीय. 12 वी बोर्डाच्या निकालावरच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्रवेश होणार आहेत. तर व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सीईटीचे धोरण जाहीर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानं महाविद्यालयांना तुकड्या वाढवण्याची मागणी करणारं पत्र देण्याचे आदेश दिले आहेत. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असा दावाही यावेळी उदय सामंत यांनी केलाय. (Arts, Commerce and Science admission on the result of 12th board examination)
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा 26 ऑगस्ट पासून होणार आहे. तर इंजिनिअरिंगची सीईटी परीक्षा 4 ते 9 सप्टेंबर आणि 9 ते 14 सप्टेंबर या दोन सत्रात होणार आहे. एलएलबी सीईटी 16 ते 9 सप्टेंबर पासून सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिलीय. आठ दिवसांत अभ्यास करुन ज्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, त्या ठिकाणचे कॉलेज सुरु करण्याच्या सूचना कुलगुरुंना दिल्या आहे. विद्यापीठातील जिल्ह्यांना महाविद्यालये सुरु करण्याचे निकष वेगळे असणार आहेत. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सामंत म्हणाले.
खासगी महाविद्यालयांना फी कमी करण्याच्या सूचना द्याव्या लागतील. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यावर फी किती कमी करायची ते सांगितलं जाईल, अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली आहे.
12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण!
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला. यंदा राज्यात 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तसेच 91, 435 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. तसेच 1372 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. 66871 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 66867 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 94.31 टक्के लागला आहे.
इयत्ता बारावीचा निकाल :
एकूण निकाल 99.63 टक्के विज्ञान – 99.45 टक्के कला – 99.83 टक्के वाणिज्य 99.81 टक्के एमसीव्हीसी – 98.8 टक्के
संबंधित बातम्या :
Maharashtra HSC Result 2021 LIVE Updates: बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला, दिनकर पाटील यांची माहिती
Arts, Commerce and Science admission on the result of 12th board examination