शरद पवार यांच्यांवर काँग्रेसचा हल्ला, ट्विट करत केले लक्ष्य
अदानी प्रकरणात जेपीसी चौकशीचा मुद्दा राहुल गांधी यांनी लावून धरला. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीची गरज नसल्याचे म्हटले होते. आता शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस नेत्या व प्रवक्त्या अलका लांबा यांनी त्यांच्यांवर टीका केलीय.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या विरोधी भूमिका घेत अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) चौकशीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी देशातील बड्या उद्योगपतींना लक्ष्य करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरही आपले परखड मत मांडले. शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस नेत्याने त्यांच्या विरोधात ट्विट केले आहे. ‘डरे हुए – लालची लोग ही आज अपने निजी हितों के चलते तानाशाह सत्ता के गुण गा रहे हैं’, असा हल्ला पवार यांच्यांवर केला आहे.
काय म्हणाले होते पवार
अदानी प्रकरणातील जेपीसी चौकशीचा मुद्दा राहुल गांधी यांनी लावून धरला. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीची गरज नसल्याचे म्हटले होते. कारण जेपीसीत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असेल तर सत्य कसे बाहेर येईल, असे पवार म्हणाले. त्याचवेळी उद्योगपतींना राजकारणासाठी लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले होते.
डरे हुए – लालची लोग ही आज अपने निजी हितों के चलते तानाशाह सत्ता के गुण गा रहे हैं – देश के लोगों की लड़ाई एक अकेला @RahulGandhi लड़ रहा है – पूंजीपति चोरों से भी और चोरों को बचाने वाले चौकीदार से भी.#Modani pic.twitter.com/JNt88bjTNU
— Alka Lamba (@LambaAlka) April 8, 2023
काँग्रेसचे ट्विट
काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता अलका लांबा यांनी ट्विटरवर शरद पवार आणि गौतम अदानी यांचा फोटो शेअर केला आहे. अन् लिहिले आहे की, ‘आज घाबरलेले लोभी लोक वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान करत आहेत. एकच राहुल गांधी देशातील जनतेची लढाई लढत आहे. ही लढाई भांडवलदार चोरांविरुद्ध तसेच चोरांना वाचवणाऱ्या चौकीदाराविरुद्ध आहे.
आता सुरु झाले स्पष्टीकरण
लांबा यांनी शरद पवार यांच्यांवर हल्ला करत “लालची” म्हटले. त्या म्हणाल्या, हे माझे मत आहे, काँग्रेसचे नाही. काँग्रेस पक्षाचे विधान त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर येते. मी काँग्रेस कार्यकर्ता आहे. माझे ट्विट हे माझ्या वैयक्तिक हँडलवरील माझे स्वतंत्र विचार आहेत. त्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या पक्षात लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.
भाजपने विचारला प्रश्न
भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेसला प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, “अलका लांबा यांच्या ट्विटनंतर मला धक्का बसला आहे. ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का?. अलका लांबा यांनी शरद पवारांवर हल्ला चढवला आहे. त्यांना लोभी आणि भित्रा म्हटले आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून मला खूप धक्का बसला आहे.”
हे ही वाचा
विरोधक का करतात अदानी, अंबानी यांना लक्ष्य? शरद पवार यांनी सांगितली राजकीय कहानी