ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत यंदाही महापरिनिर्वाण दिन साधेपणाने साजरा करावा ; डॉ अभिनव देशमुख यांचे नागरिकांना आवाहन
पुण्याच्या ग्रामीण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील दोन दोन वर्षांपासून कोरोनाच्या अकाली संकटामुळे नागरिकांना महापरिनिर्वाण दिन साजरा करता आलेला नाही. यंदाच्या वर्षी कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्याने पुन्हा एकदा नव्या जोमाने आंबेडकरी अनुयायी महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला लागले होते.
पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरून जनजीन पुन्हा पूर्ववत होत असतानाच अचानक ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटने डोकेवर काढले आहे. भारतासहा अनेक देशात फैलाव होत असलेल्या ओमिक्रॉनला रोखण्यासाठी प्रशासन सर्तक झाले आहे. कोरोनाच्या नियमांमध्ये करण्यात आलेली शिथिलता पुन्हा कडक करण्यात आली आहे.
राज्य सरकारबरोबरच स्थानिक प्रशासनही सर्तक झाले आहे. शहरात कोरोनाबाबत घालून देण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन येत्या 6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी केलं आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अनुयायांनी शांतता प्रस्थापित करुन मागील वर्षीच्या धर्तीवर साजरा करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
अनुयायांच्या आनंदावर पाणी
पुण्याच्या ग्रामीण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील दोन दोन वर्षांपासून कोरोनाच्या अकाली संकटामुळे नागरिकांना महापरिनिर्वाण दिन साजरा करता आलेला नाही. यंदाच्या वर्षी कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्याने पुन्हा एकदा नव्या जोमाने आंबेडकरी अनुयायी महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला लागले होते. मात्र अचानकपणे निर्माण झालेल्या ओमिक्रॉन संकटामुळे अनुयायांच्या आनंदावर पाणी पडले आहेत.
नियमांचे पालन करा
यंदा ओमिक्रॉनचा वाढत धोका लक्षात घेत यावर्षीही गेल्यावर्षी प्रमाणे महापरिनिर्वाण दिन साजरा करावा. यावेळी घालून दिल्या जाणाऱ्या शासकीय नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी केले आहे.
स्थानिक प्रशासनही सर्तक
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनही खूप सतर्क झाले आहे. शहरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्ये ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्क , सोशल डिस्टन्सचे पालन कारणेही बंधनकारक करण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
Amol Kolhe | पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे, मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही? : अमोल कोल्हे
Kishori Pednekar | परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी 5 सूत्री अॅक्शन प्लॅन तयार – किशोरी पेडणेकर