Rain : हवामान विभागाचा पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट, कुठे कोसळणार मुसळधार?
Mumbai and Pune Rain : राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुणे, मुंबईत गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. आता आगामी तीन दिवसांत पुणे जिल्ह्यात कसा पाऊस पडणार आहे, याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अभिजित पोते, पुणे : मुंबई अन् पुणे शहरामध्ये पावसाची संततधार गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. पुणे, मुंबईत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील दक्षिण भागात ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मान्सून यंदा उशिराने दाखल झाला होता. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे मान्सूनला यंदा उशीर झाला. २५ जूनपासून मान्सून आल्यानंतर चांगलाच वेग पकडला आहे. पुणे अन् मुंबईत संततधार सुरु असल्यामुळे सूर्यदर्शनही झाले नाही. आता पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाचे अपडेट दिले आहे.
पुणे शहरात पाऊस अन् अलर्ट
पुणे शहरात शुक्रवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील पेठा अन् उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस होत आहे. अनेक भागांत सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. पुणे जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर देखील जोरदार पाऊस झाला आहे.
IMD Extended Range Forecast for Rainfall:Wk 1:Gradually rainfall activity will be ovr N,NW & western India.Ovr EC parts of India relatively weak activityWk 2,3:Slightly weaker ovr NW Reg, but S peninsula & adj areas good activityWk 4:Rainfall likly to improve ovr central India pic.twitter.com/zQRW7FZ796
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 29, 2023
पुणे शहरात शुक्रवारी दिवसभर पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच हवामान खात्याकडून पुणे शहराला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील 3 दिवस पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून इशारा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच 1, 2 आणि 3 जुलै रोजी पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबईत सर्वत्र पाऊस
मुंबईत काल रात्रीपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. कांदिवली पश्चिम कल्परुक्ष हाईट बिल्डिंगमध्ये लिफ्ट पार्किंगचे लोखंडी आणि स्लॅब उडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मुंबईतील वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर पाऊस सुरू आहे. शुक्रवारी सकाळी रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडला आहे. अचानक जोरदार पाऊस पडत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमानीचे मात्र धावपळ उडत आहे.
चार आठवडे पाऊस
हवामान विभागाने पुढील देशभरात चांगला पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे जुलै महिना संपूर्ण पावसाचा असणार आहे. ३० जून ते ६ जुलै दरम्यान सर्वत्र पाऊस असणार आहे. त्यानंतर ७ ते १३ जुलै दरम्यान देशातील सर्वच भागात पाऊस कोसळणार आहे. १४ ते २० जुलै अन् २१ ते २७ जुलै दरम्यान देशभरात जलधारा कोसळणार आहे.