वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांना मोठा दणका, तडकाफडकी ट्रेनिंग थांबवलं; चारओळीचं पत्र पाठवून…

Pooja Khedkars Case Upate : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवलं गेलं आहे.

वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांना मोठा दणका, तडकाफडकी ट्रेनिंग थांबवलं; चारओळीचं पत्र पाठवून...
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 6:20 PM

पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षक थांबवण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून त्यांना कळवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांना आता मसूरीला ट्रेनिंग सेंटरला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  लाल बहादूर शास्त्री मसूरीमधील अॅकडमीच्या माध्यमातून हा निर्णय घेतला होता.  पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी रद्द झाल्यानंतर लगेच ईशासकीय विश्रामगृहात दाखल झाल्या आहेत. पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात असायच्या मात्र आज लवकरच बाहेर पडल्या. पूजा खेडकर यांना कोणत्याही परिस्थितीत 23  जुलै पर्यंत मसूरी येथील प्रशिक्षण केंद्रात रिपोर्टिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण सुरूवातीला ३ जून २०२४ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सुरू झालं होतं. मात्र एक महिन्यानंतर त्यांची बदली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. वाशिममध्ये त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं होतं. तिथे पूजा खेडकर यांनी त्यांच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून २५ पानी अहवाल अप्पर सचिवांना पाठवांना पाठवण्यात आला होता त्यानंतर त्यांची तात्काळ बदली वाशिम येथे झाली होती. वाशिममधील दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी होता मात्र आता यावर स्थगिती देण्यात आली आहे.

लाला बहादूर शास्त्री मसूरीमधील या अकॅडमीने हा निर्णय घेतला आहे. या अकॅडमीकडून राज्य सरकारला अहवाल देण्यासंदर्भात आदेश देण्यात आला होता. राज्य सरकारने हा अहवाल पाठवला असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांना २३ तारखेपर्यंत मसुरी येथील अकॅडमीमध्ये हजर रहावं लागणार आहे.

पूजा खेडकर यांनी पुण्याात केबिनसाठी आणि वाहनावर महाराष्ट्र शासन आणि लाल दिवा लावल्याने त्या अडचणीत आल्या होत्या. त्यासोबत खेडकर यांनी युपीएससी परीक्षेसाठी प्रमाणपत्रे सादर केली होती. दिव्यांग किंवा ओबीसी आरक्षणाचा त्यांनी काही फायदा घेतलेला यावरून आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून एक समिती स्थापन केली आहे. चौकशी सुरू असून या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही मात्र आता त्यांचं प्रशिक्षण थांबवलं गेल्याने खेडकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांचे आई-वडील दोघेही आता फरार आहेत. पूजा यांची आईच्या एका शेतकऱ्यावर बंदूक ताणल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता हे प्रकरण वाढत चाललं असून  खेडकर यांच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.