पुण्यातील ‘रानडे इन्स्टिट्यूट’च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव, नेमकं कारण काय?

पत्रकारितेसाठी देशभरातील मोजक्या प्रसिद्ध संस्थांपैकी एक असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव समोर आलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत हालचाली सुरू केल्यानंतर माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून जोरदार विरोध होतोय.

पुण्यातील 'रानडे इन्स्टिट्यूट'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव, नेमकं कारण काय?
रानडे इन्स्टिट्यूट, पुणे
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 5:24 PM

पुणे : पत्रकारितेसाठी देशभरातील मोजक्या प्रसिद्ध संस्थांपैकी एक असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव समोर आलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत हालचाली सुरू केल्यानंतर माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून जोरदार विरोध होतोय. विद्यापीठाने रानडेतील पत्रकारितेचा विभाग आणि विद्यापीठातील कम्युनिकेशन स्टडी यांचं विलिनीकरण करण्याबाबत प्रस्ताव ठेवलाय. मात्र, यामुळे ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटच्या ओळखीला धक्का लागेल, असं मत व्यक्त होत आहे.

पुणे विद्यापीठ दोन्ही विभागांचं विलिनीकरण करुन नवा विभाग तयार करण्यावर विचार करत आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास रानडे इन्स्टिट्यूटमधील अभ्यासक्रम कम्युनिकेशन स्टडीसोबत विद्यापीठात चालवला जाईल. मात्र, याला मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय. पत्रकारितेचा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात नेल्यास रानडेची वेगळी ओळख पुसली जाईल, असा आरोप होत आहे.

“रानडेची स्वतंत्र ओळख पुसण्याचा कुलगुरूंचा डाव तर नाही ना?”

अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँडचे कुलदीप अंबेकर म्हणाले, “विलिनीकरणाचा प्रस्ताव अत्यंत वेदनादायी व चीड आणणारा आहे. या रानडेचे विविध विद्यार्थी देशाभरातील अनेक माध्यम संस्थांमध्ये काम करतात. रानडेची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. ती ओळख पुसण्याचा डाव तर कुलगुरुंचा नाही ना? नेमका हा विभाग विद्यापीठात घेऊन का जात आहेत? याबाबत कुलगुरूंनी कारण स्पष्ट करावे. याबाबतचं परीपत्रक विद्यापीच्या वेबसाईटवर अद्यापही नाही. एवढी गुप्तता का? कशासाठी? कुणीही मागणी केलेली नसताना हा बदल करण्याचा अटट्हास का? कोणाच्या सांगण्यावरुन हे राजकीय षडयंञ घडतेय?”

“रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात घालू नये”

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रिका विभाग (रानडे इन्स्टिट्यूट) विद्यापीठ आवारातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजमध्ये विलिन करण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. याला युक्रांदचा विरोध आहे. रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात घालू नये. विद्यापीठ वारंवार वादाचे निर्णय जाणीवपूर्वक घेत असल्याचेच यावर दिसत आहे,” असं मत युक्रांदचे पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी व्यक्त केलं.

“दोन्ही विभागाच्या विलिनीकरणाचा निर्णय अंतिम नाही”

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर वाद झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. दोन्ही विभागाच्या विलिनीकरणाचा निर्णय अंतिम नसल्याचं त्यांनी सांगितलं. रानडेमधील वृत्तपत्रविद्या विभागाला विद्यापीठात जागा दिली जाईल. तेथे त्यांना हवे ते अभ्यासक्रम चालवता येतील. रानडेत डागडुजी आणि नुतनीकरण करणं आवश्यक असल्यानं हा निर्णय घेत आहोत.”

हेही वाचा :

पुण्यात उद्यापासून मॉल सुरू होणार पण तुम्हाला प्रवेश मिळणार का? वाचा काय आहे नियम?

Pune Corona Update : ‘शिथिलता दिली आहे, पण….’ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना इशारा

मोठी बातमी, उद्यापासून पुणे अनलॉक, व्यापाऱ्यांच्या दबावापुढे सरकारचा मोठा निर्णय, वाचा काय सुरु, काय बंद?

व्हिडीओ पाहा :

Controversy over decision of Merger of Ranade Institute in SPPU Media and Communication department

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.