मोठी बातमी: पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणाचा 12 लाखांचा टप्पा पूर्ण

Covid Vaccine | आजपर्यंत 12 लाख 3 हजार 660 जणांनी लस घेतली आहे. यामध्ये 8 लाख 88 हजार 555 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 3 लाख 15 हजार 105 नागरिकांचा दुसराही डोस झाला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे सरासरी प्रमाण 30 टक्के इतके आहे.

मोठी बातमी: पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणाचा 12 लाखांचा टप्पा पूर्ण
लसीकरण कमी झाल्यास गावचे सरपंच पद धोक्यात
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 9:30 AM

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 12 लाख 3 हजार 660 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व खासगी केंद्रांच्या माध्यमातून शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. लसीकरणाचा बारा लाखांचा टप्पा नुकताच पूर्ण झाला.

आजपर्यंत 12 लाख 3 हजार 660 जणांनी लस घेतली आहे. यामध्ये 8 लाख 88 हजार 555 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 3 लाख 15 हजार 105 नागरिकांचा दुसराही डोस झाला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे सरासरी प्रमाण 30 टक्के इतके आहे.

मुंबईत लसींचा तुटवडा

मुंबईत शनिवारी पुन्हा एकदा लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांवर ताटकळत राहण्याची वेळ आली. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात आज केवळ 150 डोस देण्यात येणार आहेत. त्यासाठी रुग्णालयाबाहेर 1000 जण सकाळपासून रांगेत उभे आहेत. गेल्या चार दिवसांपासून या परिसरातील लोक लस घेण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत.

झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सतर्क होत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पुरुषांच्या विर्यात झिकाचे विषाणू आढळत असल्याने गर्भधारणा टाळण्यासाठी व सुरक्षित संभोग व्हावा यासाठी बेलसर गावात पुरुषांना निरोधचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने भोंगागाडीच्या माध्यमातून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. गावात सर्व ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे.

गावातल्या 24 गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत. महिलांच्या रक्ताचे नमुनेही तपासले असून त्यात कोणीही झिका ग्रस्त आढळलेले नाही असे डॉ. भरत शितोळे यांनी सांगितले. गावांमध्ये विविध पद्धतीच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून ग्रामपंचायतच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे गावचे उपसरपंच धीरज जगताप यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?

सीरमचे पुनावाला मोदी सरकारवर संतप्त, पुण्यासाठी लिहिलेल्या पत्राला उत्तर नसल्याचा दावा, वाचा नेमकं काय घडलं?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.