Rupali chakankar| राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरणाचा कोरोनाची लागण ; ट्विट करून दिली माहिती
सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन
पुणे – शहरात कोरोनाचा प्रसार पन्हा एकदा वेगाने होता असल्याचे समोर आले. कोरोना रुग्णसंख्येबरोबरच शहरातील ओमिक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकरणकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
ट्विट करुन दिली माहिती
राज्य महिला आयोगाच्या या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. ‘सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 5, 2022
या मंत्र्यांनाही झाली कोरोनाची दुसऱ्यांदा लागण यापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील व त्यांची नवा विवाहित कन्या अंकिता पाटील – ठाकरे , काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीला कोरोनाची लागण झाल्ल्यामध्ये लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्या लोकांचा सर्वाधिक समावेश असल्याचे दिसून आले आहे
IND vs SA: ‘अर्धवट माहिती असेल, तर तुझं…’, भर मैदानात ऋषभ पंतचा रेसी वान डर डुसें बरोबर राडा
PM MODI PUNJAB | समजून घ्या, नेमकं मोदींसोबत पंजाबमध्ये काय झालं? सुरक्षेतली चूक की आणखी काही?
Income Tax Return : चुकीला ‘एकदा’ माफी; 31 डिसेंबरची मुदत टळली, तुमच्यासमोरीला ‘हा’ पर्याय!