पुण्यामध्ये येणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोरोना रोखण्यासाठी पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे.

पुण्यामध्ये येणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोरोना रोखण्यासाठी पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 3:20 PM

पुणे : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने पसरू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. अशात केरळमधून पुणे शहरात येणाऱ्या नागरिकांना RT-PCR टेस्ट बंधनकारक असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. (corona news RT PCR test has been made mandatory for citizens coming to Pune from Kerala)

खरंतर, कोरोनाला रोखण्यासाठी आता पुन्हा लॉकडाऊन करणार का अशा चर्चांना उधाण आलं असताना पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी RT-PCR टेस्ट बंधनकारक केली आहे. इतकंच नाही तर पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी हॉटेल्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि मंगल कार्यालयांना यांना इशारा दिला आहे. या सर्व ठिकाणी गर्दी टाळली जावी आणि कोरोना रोखण्यासाठीच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शेखर गायकवाड यांनी म्हटले आहे.

पुण्यातील आस्थापने, मंगल कार्यालये आणि आस्थापनांमध्ये नियमांची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही भरारी पथके सर्व ठिकाणी फिरून कारवाई करतील. याशिवाय, पुणे महानगरपालिकेकडून बाधित क्षेत्रातील हायरिस्क कॉन्टॅक्ट शोधून कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची मोहीम पुन्हा एकदा हाती घेण्यात आली आहे. मात्र, चाचण्यांपेक्षा लसीकरणाला अधिक प्राधान्य दिले जाईल.

पुण्यात लग्न समारंभांवर पुन्हा निर्बंध? प्रशासनाच्या हालचालींना वेग

नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याने आता पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर (Wedding ceremony) पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असताना पुणे जिल्हा हा हॉटस्पॉट बनला होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून यावेळी स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून लग्नसमारंभांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. (corona news RT PCR test has been made mandatory for citizens coming to Pune from Kerala)

संबंधित बातम्या –

पुण्याच्या ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; लस घेऊनही नर्सला कोरोनाची लागण

अमरावतीने राज्याचं टेन्शन वाढवलं, कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय

कोरोनाचा धोका वाढला; पुण्याच्या आयुक्तांकडून हॉटेल्स, मॉल्स आणि मंगल कार्यालयांना इशारा

(corona news RT PCR test has been made mandatory for citizens coming to Pune from Kerala)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.