पुणे : शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. अशावेळी पुणे महापालिकेनं अशा विद्यार्थ्यांसाठी खास वॉक इन लसीकरण सेवा सुरु केली आहे. पुणे महापालिकेच्या या सेवेला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करणारं ट्वीट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर मुंबई, ठाण्यातही शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मोहीम राबवली जात आहे. (Walk-in vaccination started in Pune for students)
पुणे महापालिकेनं सुरु केलेल्या वॉक इन लसीकरण मोहिमेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. नोंदणी करण्यासाठी महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्रही पाहायला मिळालं. याठिकाणी अवघ्या 2 तासांत 200 लसीचा कोटा संपला. त्यानंतर उद्या होणाऱ्या लसीकणासाठी आज नोंदणी सुरु करण्यात आली. या विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नाही. तर त्यांना ऑफलाईन नोंदणीद्वारेच लस दिली जात आहे. दरम्यान, विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे पत्र देणे गरजेचं आहे. त्याशिवाय त्यांना लस दिली जाणार नाही.
परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लसीकरणाची सुविधा देण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले होते. तसेच महापौर नरेश म्हस्के यांनीही यासंदर्भात पालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना ‘वॉक इन’ पद्धतीने लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
Since last evening I have requested municipal commissioners of many cities incl Pune, Nagpur, Thane amongst others to make vaccination arrangements for students due to fly abroad for studies, after consulting with Health Dept and their respective Guardian Ministers & Mayors (1/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 29, 2021
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिका विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून आता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम हात घेतलाय. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज या उपक्रमाचं लोकार्पण करण्यात आलं. हा उपक्रम राबवण्यासाठी पुणे महापालिकेला ‘जिव्हीका हेल्थकेअर’ आणि ‘माय व्हॅक्सीन’ची साथ लाभली आहे. लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात ५ मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय.
पुणे शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी 5 मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रत्येक व्हॅनमध्ये 1 डॉक्टर, 2 परिचारिका, 1 आरोग्य नोंदणी सहाय्यक, 1 आरोग्य समाजसेवक, 1 चालक आणि एईएफआय किटसह 1 रुग्णवाहिका असणार आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करण्यासाठी आपले विविध पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याची माहिती महापौरांना दिली.
पुणे शहरातील लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत. याचाच एक भाग म्हणून @MCCIA_Pune आणि @ppcr_pune ने पुढाकार घेत ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. pic.twitter.com/qyvomfvGWq
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 26, 2021
संबंधित बातम्या :
पुण्यात म्युकरमायकोसिसचा विळखा, कोरोनामुक्त नागरिकांचं 1 जूनपासून डोअर टू डोअर सर्वेक्षण
होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय पुणे शहरासाठी बंधनकारक नाही, महापालिकेची माहिती
Walk-in vaccination started in Pune for students