आधी पार्थ पवार अन् गुंड गजा मारणे भेट, आता अट्टल गुन्हेगार असिफ दाढी अजित पवार यांना भेटला

Ajit Pawar | पार्थ पवार कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे यांना भेटल्याबद्दल त्याला विचारणा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. परंतु आता स्वत: अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी जाऊन भेटला.

आधी पार्थ पवार अन् गुंड गजा मारणे भेट, आता अट्टल गुन्हेगार असिफ दाढी अजित पवार यांना भेटला
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 3:11 PM

रणजित जाधव, पुणे, दि. 5 फेब्रुवारी 2024 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. पार्थ पवार कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे यांना भेटल्याबद्दल त्याला विचारणा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांनी स्वत:च्या मुलास फटकारले आहे, असे अजिबात घडता काम नये, असे बजावले होते. परंतु आता स्वत: अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी जाऊन भेटला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्याने भेट घेतल्याचा फोटो समोर आल्याने खळबळ उडालीय.

का घेतली भेट

पुणे येथील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली. त्या प्रकरण समोर येण्यास काही तास उलटत नाही, तोच अजित पवार यांची असिफ दाढीने भेट घेतल्याचा फोटो समोर आला. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. परंतु असिफ दाढीला राजकारणात येण्याचे वेध लागल्याचे चर्चा आहे.

असिफ दाढीवर अनेक गुन्हे

असिफ दाढीवर याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर खून, किडनॅपिंग, खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहे. शस्त्रास्त्रांसह त्याला पोलीसांनी त्याला अटकही केली होती. 1988 साली असिफवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. हा त्याचा पहिला गुन्हा होता. त्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारवाया वाढत गेल्या. 2021 पर्यंत त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झालेत. 1988 मध्ये मारहाण करणे, 1996 आणि 2004 साली संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे, 2007 मध्ये अपहरण करून हत्या केली, 2009 आणि 2011 साली शस्त्राचा वापर करणे, विनापरवाना शस्त्र बाळगून कट रचने आणि 2021 साली अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी देणे, अशा गुन्ह्याचा यात समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

पार्थ पवार याने गुंड गजा मारणे यांची भेट घेतली. त्यावर हा प्रकार अत्यंत चुकीची आहे, असे अजित पवार म्हणाले होते. मग उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांनी असिफ दाढीला भेट का दिली? या विषयाची चर्चा आता सुरु झाली आहे.

हे ही वाचा

अजित पवार यांनी स्वत:च्या मुलास फटकारले, गुंड गजा मारणे याच्या भेटीवर अजितदादांची काय प्रतिक्रिया

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.