किल्ले शिवनेरीवर संचारबंदी, मात्र गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांचा उत्साह कायम

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आज साजरा होत आहे. परंतु यंदाच्या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमावर कोरोनाचं सावट आहे.

किल्ले शिवनेरीवर संचारबंदी, मात्र गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांचा उत्साह कायम
शिवनेरी
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 8:25 AM

पुणे : किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आज साजरा होत आहे. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यावर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असलं तरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आज भल्या पहाटोपासून ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषणांनी आसमंत निनादून गेला आहे.  (Curfew in Shivneri fort, Enthusiasm of Shiva devotees at the foot of the fort)

किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके तसंच इतरही महत्त्वाचे नेते, प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संचारबंदी

कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले असून शिवनेरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतला आहे.

शिवनेरीवर 100 लोकांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्वसाचा सोहळा

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शासकिय सोहळ्याची सगळी तयारू पूर्ण झालेली आहे. हा सोहळा कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत व्हावा, यासाछी शासन प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर 100 लोकांच्या उपस्थितीतच हा सोहळा करण्याचा शासनाचा मानस आहे.

छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद

शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाईवरून राज्यसभा खा. संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले आहे. या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी आज (19 फेब्रुवारी) रोजी शिवनेरी किल्ल्यावर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

(Curfew in Shivneri fort, Enthusiasm of Shiva devotees at the foot of the fort)

हे ही वाचा :

आदित्य ठाकरेंनी पेटारा उघडला, शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.