Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil | ‘कितीदा माफी मागायची? यापुढे कुणाचं ऐकून घेणार नाही’, गौतमी पाटील हिची रोखठोक भूमिका

गौतमी पाटील हिने अश्लिलतेच्या मुद्द्यावरुन होणाऱ्या टीकेवर आता आपलं रोखठोक मत मांडलं आहे. आपण अश्लिल नृत्याच्या मुद्द्यावरुन तब्बल तीनवेळा माफी मागितली आहे. असं असताना त्या मुद्द्यावरुन टीका केली जात असल्याने गौतमीने टीका करणाऱ्यांना इशारा दिलाय.

Gautami Patil | 'कितीदा माफी मागायची? यापुढे कुणाचं ऐकून घेणार नाही', गौतमी पाटील हिची रोखठोक भूमिका
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 10:03 PM

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये आज महिला दिनाच्या निमित्ताने लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. या कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. गौतमीसोबत गेल्या आठवड्यात एक विकृत आणि विक्षिप्त प्रकार घडला. त्या प्रकाराआधी तिची सोशल मीडियावर निगेटिव्ह पब्लिसिटी करण्यात येत होती. गौतमीने माफी मागितल्यानंतरही तिचे जुने व्हिडीओ पोस्ट करुन टीका केली जात होती. तसेच तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात होता. या दरम्यानच्या काळात गौतमीच्या विरोधकांनी परिसिमा गाठली. त्यांनी गौतमीला नकळत एक व्हिडीओ बनवला आणि संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकारानंतर आता गौतमीदेखील आक्रमक झालीय.

गौतमी पाटीलवर वारंवार आक्षेपार्हतेचा ठपका ठेवून टीका केली जाते. त्याच मुद्द्यावर गौतमीने आज भूमिका मांडली. “झालेल्या गोष्टींवर अनेकदा माफी मागितली. एकदा, दोनदा नव्हे तीनदा माफी मागितली. समोरच्या व्यक्तीला आता समजलं पाहिजे, हिने माफी मागितली आहे. माफी तरी कितीदा मागायची? आता यापुढे मी कोणाचं ऐकून घेणार नाही”, असं गौतमी पाटील म्हणाली. “मला अजून बरेच जण म्हणतात हीचं अश्लील नृत्य असतं. महिलांसमोर मी डान्स केला. हा डान्स अश्लील होता का? हे तुम्हीच सांगा मी तर सांगून सांगून थकले आहे”, असंही ती म्हणाली.

गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?

“मी बरेच कार्यक्रत करते. माझ्या कार्यक्रमात महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या जास्त असते. मी आज जे काही प्रेम पाहिलं ते बघून खूप छान वाटलं. आज फक्त पुरुषच नाही तर महिलांचं देखील माझ्या नृत्यावर तितकंच प्रेम आहे. माझा आज हा पहिलाच पुरस्कार होता. त्यामुळे ‘आपला आवाज आपली सखी’ यांचं आभार मानते. महिला वर्गाचं लावणीचं प्रेम बघून खूप छान वाटलं”, असं गौतमीने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“अजूनही मला अश्लिल अश्लिल असंच म्हणत आहेत. इथे महिला आहेत. माझ्याकडून काही अश्लिलपणा झालाय का ते तुम्ही सांगा. मी तर सांगून सांगून दमले की मी नाही तसं करत. महिलांचं एवढं प्रेम पाहून कुठे अश्लिलपणा कळेलच”, असं गौतमी म्हणाली.

प्रस्थापित लावणी क्षेत्रातील लोकांकडून आपली गळचेपी करण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न गौतमीला विचारण्यात आला. त्यावर तिने आपलं रोखठोक उत्तर दिलं. “आधी वाटत नव्हतं. पण आता वाटतंय. मी बोलू शकत नव्हते. काही गोष्टी झाल्या. मी एकदा, दोनदा, तीनवेळा माफी मागितली. कितीवेळा माफी मागायची? समोरच्याला कळणार कधी? समोरच्याला कळत नाही का? मी माफी मागितली आता माझ्याकडून काही होत नाही तर सॉरी मी आता पुढे ऐकून घेणार नाही”, अशी आक्रमक भूमिका गौतमी पाटीलने घेतली.

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.