गौतमीवर दु:खाचा डोंगर, गौतमी पाटील हिच्या चाहत्यांसाठी खूप वाईट बातमी

गौतमी पाटील हिच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. गौतमी पाटील आज प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे. तिचे महाराष्ट्रभरात चाहते आहेत. या सर्व चाहत्यांना धक्का देणारी मोठी आणि अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.

गौतमीवर दु:खाचा डोंगर, गौतमी पाटील हिच्या चाहत्यांसाठी खूप वाईट बातमी
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 8:25 PM

मनेश मासोळे, Tv9 मराठी, धुळे | 4 सप्टेंबर 2023 : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गौतमी पाटील हिच्या वडिलांचं निधन झालंय. चार दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात सूरत हायवेवर बेवारस अवस्थेत आढळले होते. त्यांच्यावर धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. रवींद्र पाटील यांचे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर गौतमीने आपल्या वडिलांची जबाबदारी स्वीकारली होती. गौतमीने आपल्या वडिलांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं आज निधन झालं.

रवींद्र पाटील यांना धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळ्यातील रुग्णालयात दाखल केलं होतं. याबाबतचं वृत्त गौतमीला माहिती समजल्यानंतर तिने आपल्या वडिलांना पुण्यात नेलं होतं. रवींद्र पाटील यांची धुळ्यात प्रकृती जास्त बिघडली होती. त्यामुळे गौतमीने त्यांना पुण्यात हलवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत गौतमीने व्हिडीओ जारी करत आपण माणुसकी म्हणून आपल्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारी घेतल्याचं सांगितलं होतं.

रवींद्र पाटील यांना दारुचं व्यसन होतं. या व्यसनामुळेच गौतमीची आई तिला घेऊन पुण्याला गेली होती. गौतमी पुण्यात लहानाची मोठी झाली. या दरम्यान तिने डान्स क्लास लावला. तसेच ऑर्केस्ट्रामध्ये काम केलं. गौतमीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून ती प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली होती. या दरम्यान गौतमीने एका चित्रपटातही काम केलं. असं असताना गौतमीचं आज पित्याचं छत्र हरपलं आहे.

रवींद्र पाटील यांची ओळख कशी पटली?

रवींद्र पाटील गेल्या आठवड्यात बेवारस अवस्थेत आढळले होते. धुळ्यात स्वराज्य फाऊंडेशन नावाची संस्था बेवारस व्यक्तींसाठी काम करते. या संस्थेचे दुर्गेश चव्हाण यांना रवींद्र पाटील सुरत बायपास हायवेवर बेवारस अवस्थेत आढळले. चव्हाण यांनी रवींद्र पाटील यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

रवींद्र पाटील यांच्या खिशात आधारकार्ड सापडलं होतं. त्यावर त्यांचं रवींद्र बाबू पाटील असं नाव होतं. तसेच चोपडा तालुक्यातील वेळोदे गावाचा पत्ता होता. त्यांचा फोटो, पत्ता, नाव सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर गौतमीला आपल्या वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाली होती.

या दरम्यान रवींद्र पाटील हे धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या भावजय शोभा आनंद पाटील या आपल्या मुलीसह तिथे दाखल झाल्या. शोभा यांनीच रवींद्र हे गौतमीचे वडील असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तर स्वराज्य फाऊंडेशनचे दुर्गेश चव्हाण यांना याबाबत माहिती नव्हती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.