Video : आधी अलिशान “महिंद्रा थार”, मग बैलगाड्याचा कासरा, भरणे मामांच्या डबल ड्राईव्हिंगची हवा

आजही मामांनी इंदापुरात अशीच हवा करत कार्यकर्त्यांची मनं जिंकली आहेत. कारण काही वेळाआधी आलिशान महिंद्रा थारमध्ये (Mahindra Thar) दिसणारे भरणे मामा काही वेळातच बैलाचे कासरे धरलेले दिसून आले.

Video : आधी अलिशान महिंद्रा थार, मग बैलगाड्याचा कासरा, भरणे मामांच्या डबल ड्राईव्हिंगची हवा
दत्ता भरणेंची डबल राईडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 6:36 PM

इंदापूर : इंदापूरच्या राजकारणात दत्ता भरणे (Datta Bharne) आणि हर्षवर्धन पाटील ही दोन नावं नेहमीच चर्चेत असता. त्यातलं आघाडीवरचं नावं म्हणजे दत्ता भरणे यांचं. कार्यकर्ते भरणेंना प्रेमाने मामा म्हणतात. गेल्या काही वर्षात हर्षवर्धन पाटालांना चेकमेट देत भरणे मामांनी इंदापूरचा गड राखलाय. शिवाय भरणेंना अजित पावाराचेही (Ajit Pawar) पाठबळ तगडं आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे नेहमीच त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्रभर चर्चेत असतात, त्यांच्या साध्या व सरळ कार्यपद्धतीमुळे जनसामान्यांना त्यांचा हेवा वाटतो, कार्यकर्तांच्या मामा बोलण्यामुळे की काय ते मामा या नात्याला साजेस काम करीत असल्याचे नेहमीच दिसून येतं. आजही मामांनी इंदापुरात अशीच हवा करत कार्यकर्त्यांची मनं जिंकली आहेत. कारण काही वेळाआधी आलिशान महिंद्रा थारमध्ये (Mahindra Thar) दिसणारे भरणे मामा काही वेळातच बैलाचे कासरे धरलेले दिसून आले.

भरणेंची आधी थार राईड

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने महिंद्रा कंपनीची स्टायलिश थार गाडीचे पूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते केले, पूजन केल्यानंतर राज्यमंत्री भरणे यांनी स्वतः या स्टेरिंग हातात घेत गाडी चालवली व काही वेळ या गाडीतून प्रवास केला, हा प्रवास करीत असताना पुढे ते तालुक्यातील लाकडी या गावी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीस उद्घाटन करण्यास आले होते, स्टाइलिश अशी महिंद्रा थार गाडी स्वतः चालवीत असताना या ठिकाणी अनेकांनी त्यांना पाहिले. अनेक लहान मुले मामा आले मामा आले असे म्हणतात गाडीजवळ जमले होते, गाडीतून उतरताच मामांनी या लहान मुलांना जवळ घेत प्रत्येकाची विचारपूस केली.

आधी कार राईड

भरणेंच्या हाती बैलांचे कासरे

लहान मुलांची विचारपूस केल्यानंतर, पुढे ते बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनासाठी गेले., यावेळी तेथील आयोजकांनी त्यांना एका बैलगाड्याचा दोर हाती दिला, यावेळी भरणे मामांनी या बैलगाडाचा कासरा हाती घेत संपूर्ण माहिती घेतली. अशा पद्धतीने आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हाती दोन स्टेरिंग दिसून आल्या. आधुनिक युगातील महींद्रा थारच्या वेगाचे चक्र सांभाळल्यानंतर भरणे यांच्या हातांनी ग्रामीण कृषी परंपरेतील बैलगाडीचा कसदार कासरा त्याच दिमाखात पकडून उभे होते. भरणे मामांचे हेच साधेपण कार्यकर्त्यांना आवडते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघ त्यांच्या पाठिमागे उभा राहिलाय.

राज्यमंत्र्यांच्या हाती बैलगााडा

फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करा, फोन टॅपिंगमागे नेमकं कोण?

Photo : संभाजीराजेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; आझाद मैदानावर कार्यकर्त्यांची रिघ, सरकारकडून अद्याप ठोस भूमिका नाही

IND vs SL: टीम इंडियाच्या बसमध्ये काडतूसचे खोके मिळाल्याने खळबळ, चंदीगडमध्ये आहे कसोटी सामना

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....