Pune rain : पुढचे काही दिवस उष्णतेचे, पुण्यात दिवसाच्या तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा अंदाज

रविवारी (4 सप्टेंबर) तारखेला जम्मू आणि काश्मीरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आज तर उत्तराखंडमध्ये उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Pune rain : पुढचे काही दिवस उष्णतेचे, पुण्यात दिवसाच्या तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा अंदाज
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 3:58 PM

पुणे : पुणे शहर परिसरात शुक्रवारी दिवसभरात 33.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, (India Meteorological Department) शहरातील दिवसाचे तापमान उच्च पातळीवर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत शहरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शुक्रवारी दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा 5.1 अंश सेल्सिअस अधिक होते. तर रात्रीचे 22.4 अंश सेल्सिअस तापमान हे सामान्यापेक्षा 1.3 अंश सेल्सिअस जास्त होते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) म्हणाले, की पुढील काही दिवसांत दिवसाचे तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 4 सप्टेंबरपर्यंत शहरातील दिवसाचे तापमान (Temperature) 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुपारपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण

दुपारपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण राहील. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत शहरात हलका पाऊस पडेल, असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये 4 सप्टेंबरपर्यंत हवामानाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

हे सुद्धा वाचा

ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट

5 सप्टेंबरपासून मराठवाडा आणि विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे, असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले. मान्सून समुद्रसपाटीपासून त्याच्या सामान्य स्थितीच्या उत्तरेकडे जातो. लक्षद्वीप क्षेत्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर चक्रीवादळ परिवलन आहे, असे त्यांनी सांगितले.

मेघगर्जनेसह मुसळधार

दुपारी 1.15 मिनिटांनी घेतलेल्या उपग्रह छायाचित्रावरून असे दिसते, की राज्यातील रायगडपासून गोवा, कर्नाटक आणि केरळपर्यंतच्या घाट क्षेत्रांवर मेघगर्जनेचे ढग दाटून आलेले आहेत. पुढील काही तास महत्त्वाचे आहेत. रायगडपासून मध्य महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तसेच केरळच्या काही भागांतही हीच स्थिती राहणार आहे, असे ट्विट हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी केले आहे.

देशभरात कुठे पाऊस?

रविवारी (4 सप्टेंबर) तारखेला जम्मू आणि काश्मीरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आज तर उत्तराखंडमध्ये उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.