एक म्हणतो 25 हजार कोटींचा घोटाळा, दुसरा म्हणतो 10 हजार कोटींचा घोटाळा; विरोधकांच्या आरोपांनंतर अजितदादांनी लिस्टच काढली

Ajit Pawar | गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील 65 कारखाने हे दुसऱ्या कंपन्यांनी चालवायला घेतले आहेत अथवा ते विकण्यात आले आहेत. हे कारखाने किती किंमतीला विकले गेले, याचा सविस्तर तपशीलच अजित पवार यांनी पत्रकारपरिषदेत मांडला.

एक म्हणतो 25 हजार कोटींचा घोटाळा, दुसरा म्हणतो 10 हजार कोटींचा घोटाळा; विरोधकांच्या आरोपांनंतर अजितदादांनी लिस्टच काढली
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 12:32 PM

पुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा भ्रष्टाचार केल्याच्या विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले. गेल्या काही दिवसांत काहीजण बेछूट आरोप करत आहेत. एकजण म्हणतो साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला, दुसरा म्हणतो 10 हजार कोटींचा घोटाळा झाला. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. साखर कारखान्यांच्या विक्रीची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पडल्याचा दावा करताना अजित पवार यांनी विक्री झालेल्या साखर कारखान्यांची यादीच जाहीर केली.

ते शुक्रवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. अनेक साखर कारखान्यांची सरकारी यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये काहीही निष्पन्न झालेले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील 65 कारखाने हे दुसऱ्या कंपन्यांनी चालवायला घेतले आहेत अथवा ते विकण्यात आले आहेत. हे कारखाने किती किंमतीला विकले गेले, याचा सविस्तर तपशीलच अजित पवार यांनी पत्रकारपरिषदेत मांडला.

किरीट सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले होते. या आरोपांना अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात माझ्या नातेवाईकांवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जरंडेश्वर कारखाना सर्वप्रथम मुंबईस्थित गुरु कम्युनिटी कंपनीने विकत घेतला होता. त्यानंतर हा कारखाना बीव्हीजी समूहाच्या हणमंत गायकवाड यांनी विकत घेतला होता. त्यासाठी हणमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली होती. मात्र, तोटा झाल्याने त्यांनी हा कारखाना दुसऱ्या कंपनीला विकून टाकल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण राज्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या नियमांमुळे उत्सवावर बंधने आलेली होती. मात्र, आता ही बंधने शिथील होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.

अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी पुणेकरांकडून होत होती. त्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, असं पवार यांनी सांगितलं. गेल्या पंधरा दिवसात लसीकरणात 9 टक्के वाढ झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; पीएफ व्याजाचे पैसे खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात

चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

VIDEO: 100 कोटी डोसचं लक्ष्य खरोखरच पूर्ण झालंय का?; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.