इंदोरीकर महाराजांच्या विहिरीत हरणाचा मृत्यू; उंबरी येथे बिबट्याचा मुक्त संचार?
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या उंबरी-बाळापूर शिवारातील विहिरीत मृत हरीण आढळून आले आहे. (deer falls into deep well, dies in sangamner)
शिर्डी: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या उंबरी-बाळापूर शिवारातील विहिरीत मृत हरीण आढळून आले आहे. बिबट्याने पाठलाग केल्याने हे हरीण विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून उंबरी-बाळापूर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (deer falls into deep well, dies in sangamner)
संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे इंदोरीकर महाराज यांची शेतजमीन आहे. या शेतात रविवारी 1 वाजता एक मृतावस्थेतील हरीण आढळून आलं. संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर हे या शेतातून कामानिमित्त जात असताना त्यांना हे हरीण आढळून आले. त्यामुळे त्यांनी इंदोरीकर महाराज यांना याबाबतची माहिती दिली. त्याशिवाय संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे आणि वनक्षेत्रपाल सागर माळी यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने या हरणाला विहिरीबाहेर काढले. त्यानंतर निंबाळे रोपवाटिकेत नेऊन हरणाचे शवविच्छेदन करून त्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
कोपरगाव परिसरात हरणांची संख्या अधिक आहे. रात्री अन्नाच्या शोधात हे हरिण भरकटले असावे. अंधार असल्याने ते विहिरीत पडले असावे किंवा हरणाच्या मागे बिबट्या लागल्याने जीवाच्या आकांताने पळताना हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, बिबट्याने पाठलाग केल्याने हे हरीण मेले असेल तर या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असावा, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, इंदोरीकर महाराज यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या या हरणाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (deer falls into deep well, dies in sangamner)
VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 28 December 2020 https://t.co/HroBsDqyQh @CMOMaharashtra #fastnews #TopNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
संबंधित बातम्या:
LIVE | मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी लक्झरी बसला अपघात, दोघे गंभीर जखमी
साई बाबांच्या आरतीसाठी देणगीची मागणी? महिला भाविकांचा आरोप
(deer falls into deep well, dies in sangamner)