पुणे, मुंबईवरुन जाणाऱ्या विमानांचा तिकीट दरासंदर्भात महत्वाचा बदल, कुठे वाढ तर कुठे भरघोस कपात

Pune News : पुणे विमानतळ अद्यावत होत आहेत. या विमानतळावरुन अनेक सुविधा मिळत आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. आता नवीन अनेक शहरात पुण्यावरुन थेट जाता येणार आहे. तर अनेक ठिकाणी भाडे कमी झालेले आहे.

पुणे, मुंबईवरुन जाणाऱ्या विमानांचा तिकीट दरासंदर्भात महत्वाचा बदल, कुठे वाढ तर कुठे भरघोस कपात
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 2:20 PM

पुणे : पुणे, मुंबईवरुन विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातून अनेक ठिकाणी नवीन विमानसेवा सुरु केली जात आहे. जून महिन्यात 11 नवीन विमान सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच रिक्त असलेल्या स्लॉटमध्ये जुलै महिन्यात लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. त्याचवेळी दिल्लीवरुन पुणे येण्यासाठी विमानाच्या तिकीट शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. गो फर्स्टचे परिचालन निलंबित केल्यानंतर हा बदल झाला आहे. देशातील मुख्य दहा मार्गांवरील हवाई तिकिटांचे दर ६ जूनच्या तुलनेत २९ जून रोजी ७४ टक्के कमी झाले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमान वाहतूक मंत्रालयाने हवाई मार्गावरील दर कपात करण्याचे निर्देश दिले होते.

कोणत्या मार्गावर झाला बदल

दिल्ली ते पुणे मार्गावर तिकीट दरात ७० टक्के कपात झाली आहे. दिल्ली अहमदाबाद मार्गावर ७२ टक्के तर दिल्ली-श्रीनगर मार्गावर ३६ टक्के हवाई भाडे कमी झाले आहे. त्याचवेळी काही मार्गांवरील तिकिटांचे दर वाढले आहे. मुंबई ते दिल्ली मार्गावरील दर २३ टक्के वधारले आहे तर पुणे दिल्ली मार्गावरील दरात १७ टक्के वाढ झाली आहे.

का झाला बदल

विमान प्रवासाचे दर कमी करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. विमान प्रवाशाचे दर वाढल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती. तसेच भारतात विमान कंपन्यांना दर ठरवण्याचे अधिकार आहे. त्यावर नियंत्रण नाही. यामुळे सर्वच विमान कंपन्यांनी दर वाढवले होते. ते कमी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश दिले, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती.

हे सुद्धा वाचा

देशात मागणीनुसार असतात दर

भारतात विमान तिकिटांच्या दरासंदर्भात काहीच नियम नाही. मागणी वाढल्यास दर वाढतात, असे समीकरण आहे. यामुळे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन दर कपात करण्याचे सांगितले होते. त्यानंतर अनेक मार्गावरील दर कमी झाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.