काय सांगता? मध्यरात्री अडीच वाजता आली OLA Scooter Delivery ची डिलिव्हरी
पुण्यात ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केलेल्या ओला इलेक्ट्रीक स्कूटरची डिलिव्हरी चक्क मध्यरात्री ग्राहकाला मिळाल्याची घटना घडली आहे. शहारातील शुक्रवार पेठेत वास्तव्यास असलेल्या सचिन यांना मध्यरात्री अडीच वाजता ओला इलेक्ट्रीक स्कूटरची डिलेव्हरी मिळाल्याने त्यांनी अखेर हुश्श्य केलं.
पुणे – शहरात वाहतुकीसाठी दुचाकीचा सर्वाधिक वापर केला आहे. अलीकडे इलेक्ट्रीक स्कूटरच्या खरेदीला प्राधान्य दिले जाते. विविध कंपन्यांनी स्कूटरच्या डिलिव्हरींना सुरुवात केली आहे. अशाच प्रकारे ओला कंपनींनेही ऑनलाईन नोंदणी करत इलेक्ट्रीक स्कूटर खरेदीसाठी लोकांना प्रेरित केलं . मात्र त्यानंतर आज – उद्या करत चक्क चार-पाच महिने झाले तरी इलेक्ट्रीक स्कूटरच्या ऑर्डरची पूर्तता करणे शक्य होत नसल्याचे दिसूनआलं
मध्यरात्री आली डिलिव्हरी
पुण्यात ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केलेल्या ओला इलेक्ट्रीक स्कूटरची डिलिव्हरी चक्क मध्यरात्री ग्राहकाला मिळाल्याची घटना घडली आहे. शहारातील शुक्रवार पेठेत वास्तव्यास असलेल्या सचिन यांना मध्यरात्री अडीच वाजता ओला इलेक्ट्रीक स्कूटरची डिलेव्हरी मिळाल्याने त्यांनी अखेर हुश्श्य केलं. मध्यरात्री डिलिव्हरी दिल्याने यांनी पुण्यातील ओला इलेक्ट्रीक टीमचे आभार मानले. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डिलिव्हरी मिळाल्याने त्यांनी आनंदित होत ट्विट करत ओलाचे प्रमुख भावेश अग्रवाल याचेही आभार मानले.
??Huge thanks to everyone @OlaElectric for putting in everything over last few weeks. We’ve been delivering through the new year night too. I know we’ve more to do. Many who couldn’t get deliveries will get in next days. We’re doing all things possible to get your S1 to you soon! https://t.co/Iy2sK8TIA8
— Bhavish Aggarwal (@bhash) January 1, 2022
भाविश यांनीही साधली संधी भाविश यांनी देखील संधी दवडता आपल्या टीमचे आभार मानले आहेत. आम्ही नवीन वर्षाच्या रात्रीदेखील ओला स्कूटर डिलिव्हर केली आहे. मला माहिती आहे, आम्हाला अजून खूप काम करायचे आहे. ज्या लोकांना स्कूटर मिळालेली नाही, त्यांना पुढील काही दिवसांत मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
Kangana Ranaut : आपल्यावरचं संकट टळण्यासाठी कंगना रणौत राहू-केतूच्या चरणी! म्हणाली…
South Africa vs India 2nd Test: उद्या पाऊस खेळ बिघडवणार? काय आहे जोहान्सबर्गचा वेदर रिपोर्ट