‘तुम्ही मते दिली म्हणजे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का?’; अजित पवार भर मंचावर संतापले

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत एका कार्यक्रमात चांगलेच संतापले. त्यांचं भाषण सुरु असताना काही कार्यकर्ते आणि नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला. यानंतर संतापलेले अजित पवार यांनी 'तुम्ही मते दिली म्हणजे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का?', असं वक्तव्य केलं.

'तुम्ही मते दिली म्हणजे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का?'; अजित पवार भर मंचावर संतापले
अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 4:13 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भर मंचावर आपल्या कार्यकर्त्यांवर संतापले. “तुम्ही मते दिली म्हणते मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?” असा सवाल अजित पवारांनी केलाय. बारामतीमधील एका कार्यक्रमात अजित पवार चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार इतके का संतापले? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जातोय. अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते बारामतीत विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. या दरम्यान मेधा येथे पेट्रोल पंपच्या उद्घाटनावेळी अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर नागरिक त्यांना निवेदन देण्यासाठी पुढे जात होते.

नागरिकांचे निवेदन स्वीकारत असताना अजित पवार हे अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याचे निर्देश देत होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याने अनेक कामे रखल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या तक्रारीत हो ला हो मिळवलं. या घडामोडींमुळेच मंचावर नागरिकांसोबत संवाद साधत असलेले अजित पवार संतापले. त्यांनी रागात संबंधित वक्तव्य केलं.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“अरे तुम्ही ना, तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलं का? मला सालगडी केलं का?”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही आता व्हायरल होत आहे. त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सगळं त्यांचं आहे. लोकांना उपाशी ठेवायचे ते ठरवतील. माझं मत आहे की, मला लोकांनी मतं दिली तर मी त्यांचा सालगडी आहे. एवढे दिवस सत्ता तुम्हाला मतदारामुळे मिळाली. हा मतदारांचा अपमान आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

हे सुद्धा वाचा

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.