Ajit Pawar | महाराष्ट्रात निर्बंध कठोर होण्याचा निर्णय केव्हा होणार? अजित पवारांनी स्पष्टपणेच सांगून टाकलं!
आधी मुंबईत रुग्णवाढ, त्यानंतर महाराष्ट्रात अचानकपणे पुन्हा वेग पकडलेली रुग्णवाढ आणि आता मुंबई, महाराष्ट्रासह राज्याच्या प्रत्येकच कानाकोपऱ्यात रुग्णवाढ होत असल्यामुळे राज्य सरकार कडक पावलं उचलण्याची शक्यता आहे.
पुणे : पुण्यात (Pune) बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य पातळीवर महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govenrment) काय निर्णय घेणार आहे, आणि हे निर्णय केव्हा घेतले जाणार आहेत, याची माहिती दिली. पुण्यात अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
कधी ठरणार?
मुंबईत उद्या राज्यातील मंत्र्यांची बैठक होणार आहे. सकाळी 9 वाजत ही बैठक पार पडले. या बैठकीत राज्यपातळीवर काय निर्बंध आणि नियमावली जारी करायची, याबाबचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, असा अंदाज वर्तवला जातो आहे. बुधवारी होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. मात्र अजूनही म्हणावी तशी गर्दी कमी होत नसल्यामुळे आता बुधवारी होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाच असणा आहे.
आधी मुंबईत रुग्णवाढ, त्यानंतर महाराष्ट्रात अचानकपणे पुन्हा वेग पकडलेली रुग्णवाढ आणि आता मुंबई, महाराष्ट्रासह राज्याच्या प्रत्येकच कानाकोपऱ्यात रुग्णवाढ होत असल्यामुळे राज्य सरकार कडक पावलं उचलण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात पुण्यातून झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालंय.
नवे नियम काय आहेत?
मास्क नसलेल्यांना 500 रुपये दंड आणि मास्क नसताना थुंकल्यावर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल, असं या जाहीर करणयात आलं आहे. पुण्यासाठी घेण्यात आलेले हे नियम लवकरच राज्यपातळीवर देखील घेतले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान, कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. महाविद्यालयांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाला नियमांचं काटेकोरपणे पालन होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचं यावेळी पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय.