राज्यपालांनी अंत पाहू नये; आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून अजित पवार संतापले

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. (Deputy CM Ajit Pawar slams bhagat singh koshyari over Governor Appointed MLA)

राज्यपालांनी अंत पाहू नये; आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून अजित पवार संतापले
अजित पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 11:34 AM

पुणे: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. (Deputy CM Ajit Pawar slams bhagat singh koshyari over Governor Appointed MLA)

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हा संताप व्यक्त केला. राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. राज्यपालांना 12 नावं दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही देण्यात आलं. आम्हाला पूर्ण बहुमत आहे. सभागृहातही 171 आमदारांचं बहुमत सिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांनी अंत पाहू नये, असं अजित पवार म्हणाले.

काळवेळ मर्यादा आहे की नाही?

राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सर्व करण्यात आल्या आहेत. एवढं सर्व झालेलं असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नाहीत. त्यामुळे कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावं लागेल. सही का करत नाहीत हे विचारावं लागेल. किती काळ थांबायचं हे विचारलं पाहिजे. शेवटी अधिकार त्यांचा असला तरी काही काळवेळ मर्यादा आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.

त्यावेळी सेलिब्रिटींना कोणी रोखलं होतं?

शेतकरी आंदोलनावरून ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींनाही अजित पवार यांनी झापले. शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलनाला बसले होते. त्यावेळी तुम्हाला मत मांडायला कोणी रोखलं होतं. आता एका पॉप सिंगरने ट्विट केल्याने तुम्हाला जाग कशी आली?, असा सवाल करतानाच परदेशी सेलिब्रिटींनी आंदोलनावर बोलणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यात काही गैर नाही. परदेशातही एखादी धक्कादायक घटना घडल्यावर आपण व्यक्त होतोच ना? असा सवालही त्यांनी केला. (Deputy CM Ajit Pawar slams bhagat singh koshyari over Governor Appointed MLA)

पुणे पालिका एकत्र लढणार

यावेळी अजितदादांनी पुणे महापालिका एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट केलं. पुणे पालिकेची निवडणूक गनिमी काव्याने लढणार आहे. त्यासाठी शिवसेना, काँग्रेसशीही चर्चा करण्यात येईल. पुणे पालिकेत मत विभागणी होऊ नये आणि ग्रामपंचायतीसारखं यश मिळावं यासाठी आमचा प्रयत्न असेल, असं सांगतानाच सासूचे दिवस संपलेत आता सुनेचे दिवस आले आहेत. त्यानुसार मतदार विचार करतील, असंही ते म्हणाले. (Deputy CM Ajit Pawar slams bhagat singh koshyari over Governor Appointed MLA)

संबंधित बातम्या:

पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं : अजित पवार

उद्धव ठाकरेंमधील छायाचित्रकार जागा, लोणार सरोवर पाहणीवेळी मोबाईल फोटोग्राफी!

हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकजुटीत सरकारला देशद्रोह कसा दिसतो? संजय राऊतांचा सवाल

(Deputy CM Ajit Pawar slams bhagat singh koshyari over Governor Appointed MLA)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.