Lonavala traffic jam : पर्यटनाचा झाला विचका! बंदी असतानाही पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी, तर बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीची कोंडी

लोणावळा पोलिसांनी लोणावळ्यातील पर्यटनस्थळे बंद केल्यामुळे अशाप्रकारची मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Lonavala traffic jam : पर्यटनाचा झाला विचका! बंदी असतानाही पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी, तर बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीची कोंडी
लोणावळ्यात लागलेल्या वाहनांच्या रांगाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 3:18 PM

लोणावळा, पुणे : लोणावळा शहरात मोठी वाहतूक कोंडी (Lonavala traffic jam) झाली आहे. परिसरात पर्यटनास बंदी असतानादेखील अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आज सुट्टीचा दिवस असल्याने आणि अधून मधून पाऊसदेखील काही प्रमाणात असल्यामुळे वर्षाविहारासाठी पर्यटकांनी (Tourists) गर्दी केली आहे. त्यामुळे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा रस्त्याच्या दुतर्फा दिसून येत आहेत. कुमार चौक ते नारायणी धामपर्यंत त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy rain) लोणावळा परिसरात पर्यटकांनी येवू नये, याकरिता काही दिवस या संपूर्ण परिसरात पर्यटकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाच्या सूचनांचे पालन काही पर्यटकांकडून होताना दिसत नाही. सुट्टी असल्याने अनेकांची पावले वर्षाविहारासाठी याठिकाणी वळाली आहेत.

वाहतूक पोलिसांवर मोठा ताण

लोणावळा पोलिसांनी लोणावळ्यातील पर्यटनस्थळे बंद केल्यामुळे अशाप्रकारची मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोणावळा वाहतूक पोलिसांवर या वाहतूक कोंडीमुळे मोठा ताण आला आहे. कालदेखील वीकएन्ड शनिवारच्या निमित्ताने लोणावळ्यात पर्यटकांनी गर्दी केली होती. भूशी डॅम परिसर अतिवृष्टीमुळे धोकादायक बनला आहे. त्या ठिकाणाहून पर्यटकांना पोलिसांनी हुसकावून लावले होते. त्यानंतर आज पुन्हा पर्यटकांनी गर्दी केली आहे. आज मुसळधार पाऊस नसला तरी मध्ये मध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर

अनेक वाहनचालक मागून ओव्हरटेक करत पुढे निघून जात आहेत. अनेकजण मध्येच घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे कोंडीच भर पडत असल्याचे काही वाहनचालकांनी सांगितले आहे. प्रामाणिकपणे येवून, वाहतुकीचे नियम पाळून प्रवास केला तर कोंडी होणारच नाही. मात्र रस्त्यावर बेशिस्तपणा प्रचंड वाढला आहे, असे काही वाहनचालकांचे मत आहे. अर्ध्या तासाहून अधिक काळ एकाच जागेवर असल्याने काही वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.