पुण्यात बोलण्यात ‘उणे’गिरीच कामाची? फडणवीस म्हणतात जास्त बोलू नये! नेमकं काय घडलंय?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सुद्धा दिल्लीला जाणार आहे. पण आज जाणार नाही. तसंच 2024 च्या निवडणुकीत आमचं एकच इंजिन असणार आहे, असं म्हणत त्यांनी मनसेबाबतच्या युतीवर भाष्य केलं.
पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. अतिशय वेगाने महामेट्रोने काम केलं आहे, मी महामेट्रोचं अभिनंदन करतो. 2016 मध्ये मोदी सरकार आणि राज्य सरकारने या कामाला मंजुरी दिली होती, त्यानंतर वेगाने हे काम होत आहे,असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांना भाजपच्या दिल्लीतील घडामोडींवर प्रश्न विचारण्यात आला. सध्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत आहेत, नुकतंच आशिष शेलार हे सुद्धा दिल्लीत होते. तुम्हीही दिल्लीला जाणार आहात का असा प्रश्न विचारण्यात आला. (devendra fadnavis comment on pune corona restrictions said traders can not bear more loss)
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सुद्धा दिल्लीला जाणार आहे. पण आज जाणार नाही. तसंच 2024 च्या निवडणुकीत आमचं एकच इंजिन असणार आहे, असं म्हणत त्यांनी मनसेबाबतच्या युतीवर भाष्य केलं.
श्रेयवादाचा कोणताही विषय नाही
दरम्यान, पुणे मेट्रो कामात कोणताही श्रेयवाद नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, “सिव्हिल कोर्ट स्टेशन हे मल्टीमॉडेल स्टेशनचे चांगलं उदाहरण आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना इथं पहायला मिळेल. सगळ्या प्रकारचं काम इथं पहायला मिळत आहे. कोरोनामुळे कदाचित थोडा उशीर होईल, मात्र श्रेयवादाचा कोणताही विषय नाही”असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते उदघाटन
अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याच हस्ते या कामाचं उद्घाटन होईल. पण काम पूर्ण होईल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते उदघाटन होईल. याला कोणी विरोध करणार नाही. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा याला खूप विरोध होता. पण आता काम पुढे जातंय. मेट्रोच्या पुढच्या कामांना केंद्राकडून लवकरात लवकर कशी मान्यता मिळेल, निधी मिळेल, यासाठी नक्की प्रयत्न करणार, असं फडणवीस यांनी सांगतिलं.
तेजस ठाकरेंवर प्रतिक्रिया
ठाकरे घराण्यांची दुसरी तिसरी पिढी येत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं म्हणत त्यांनी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्यावर भाष्य केलं.
शहाण्याने सांगितलं, पुण्यात जास्त बोलू नये
पुण्यातील निर्बंध कमी केले पाहिजेत, व्यापारी आता तोटा सहन करु शकत नाहीत. तुम्ही पुण्यात कमी बोलता असं म्हणतात. पण मला शहाण्या माणसाने सांगितलं आहे, पुण्यात जास्त बोलू नये, अशी टीपणी फडणवीसांनी केली.
इतर बातम्या :
2024 ला आमचं एकच इंजिन असणार, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; चंद्रकांतदादा-राज भेट निष्फळ?
(devendra fadnavis comment on pune corona restrictions said traders can not bear more loss)