अजित पवार यांचं चुकीचं वक्तव्य, फडणवीसांकडून करेक्शन, संभाजी महाराजांबद्दल नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र सरकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचा विकास करणार आहे. इथे भव्य संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. याच स्मारकाचं भूमीपूजन आज आयोजित करण्यात आलं. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या एका वक्तव्यावरुन भर कार्यक्रमात माफी मागितली.

अजित पवार यांचं चुकीचं वक्तव्य, फडणवीसांकडून करेक्शन, संभाजी महाराजांबद्दल नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 8:51 PM

पुणे | 2 मार्च 2024 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू-तुळापूर येथील समाधीस्थळी आज महत्त्वाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र सरकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचा विकास करणार आहे. इथे संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. याच स्मारकाचं भूमीपूजन आज आयोजित करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक चुकीचं वक्तव्य केलं. या वक्तव्यातील चूक देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली. त्यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास ही चूक आणून दिली. त्यानंतर अजित पवार यांनी माफी मागितली.

“महाराज आपल्या स्वत:च्या आयुष्यात एक सुद्धा निवडणूक हारले नाही, अशाप्रकारचा इतिहास आहे”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. या वक्तव्यातील चूक फडणवीसांनी लक्षात आणून दिल्यानंतर अजित पवार यांनी माफी मागत स्पष्टीकरण दिलं. “सॉरी ते मी राजकारणामुळे निवडणूक म्हटलं. ते लढाई हारले नाहीत. लोकसभेच्या निवडणुकी आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकींशिवाय काय कळत नाही. पण आमच्यामध्ये एक निष्णांत देवेंद्र फडणवीस आहेत. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथे लक्षात आणून देतात. धन्यवाद देवेंद्रजी. असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या. आमचं कार्यक्रमाला येतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणं चाललं होतं. पण चुकून शब्द गेला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो”, अशा शब्दांत अजित पवार यांनी माफी मागितली.

अजित पवार संभाजी महाराजांबद्दल आणखी काय म्हणाले?

“आपले जे आदर्श आहेत, आपले जे महापुरुष होऊन गेले, पुढे इतिहासातमध्ये नवीन पिढीलादेखील त्यांचा इतिहास कळायला हवं. त्यांचं शौर्य काय पद्धतीचं होतं ते समजलं पाहिजे म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. आज आपण इथे तुळापूरमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ स्मारकाच्या विकासकामाचं भूमीपूजन होत असताना, आपण सगळ्यांनी संभाजी महाराजांच्या आचारविचारांची जपवणूक करण्यासाठी स्मारक बनवतोय. आपल्या सर्वांना हे स्मारक ऊर्जा देत राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. इथे वढू आणि तुळापूरमध्ये आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणाचं फक्त बलिदान दिलं नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याचा आदर्श निर्माण केला”, असं अजित पवार म्हणाले.

मुख्य बातमी : अजित पवार यांना भर कार्यक्रमात मागावी लागली माफी, नेमकं काय घडलं?

“संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी जो लढा दिला त्याने केवळ आपलं स्वराज्यच नाही तर संपूर्ण भारतात त्यांची प्रेरणा घेतली गेली होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढे नेण्याचं काम केलं. संभाजी महाराजांच्या जन्मानंतर अतिशय अल्प काळात त्यांच्या माता महाराणी सईबाई यांचं निधन झालं. या दु:खाची कल्पनाही करता येत नाही. पण सईबाईंच्या पश्चात शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी संभाजी महाराज यांना उभं करण्याचं काम केलं. स्वराज्याच्या या युवराजात त्यांनी स्वराज्य स्थापनेचा विचार पेरला. राजमाता जिजाऊंनी त्यांच्या जडणघडणीत विशेष लक्ष दिलं. इतिहासात याची नोंद आहे. त्यांनी संभाजी महाराज यांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिलं”, असं अजित पवार म्हणाले.

“संभाजी महाराजांना सुसंस्कृत पारसी भाषेचा गाढा अभ्यास होता. त्यांनी बुधभूषण, नायिकाभेद, सातशतक, नखशिक असे ग्रंथ लिहिले. वेळ मिळेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजेंना लष्करी विद्या शिकवण्याचं काम केलं. ते अनेकदा त्यांना वेगवेगळ्या स्वारीवर नेत होते. ही महाराजांनी त्यांच्यात लढाऊ विचारांची केलेली पेरणी होती. महाराज संभाजी महाराजांना लहान वयातच औरंगजेबाच्या भेटीसाठी घेऊन गेले होते. छोट्या शंभूराजांना पुढच्या काळात स्वराज्य रक्षणाकरता निर्भिड करण्याकरता शिवाजी महाराजांनी तसं केलं होतं. अशा कितीतरी गोष्टी ज्या इतिहासात घडल्या ज्या तुम्हाला सांगता येऊ शकतात पण आता वेळ बराच झालाय”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.