पिझ्झा, बर्गर देणाऱ्या पोलिसांना बरखास्त करू; देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा

पुणे हिट अँड रन प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला पिझ्झा, बर्गर देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही आता कारवाई होणार आहे. याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

पिझ्झा, बर्गर देणाऱ्या पोलिसांना बरखास्त करू; देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा
देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 3:19 PM

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याचा आरोप केला जातोय. या आरोपांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा दिला आहे. आरोपीला पिझ्झा, बर्गर देणाऱ्या पोलिसांना बरखास्त करू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील हिट अँड रन घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जनतेकडून या प्रकरणावर दबाव वाढल्यानंतर फडणीस आज थेट पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत घटनेचा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ही घटना अतिशय गंभीर असून, कुणालाही सोडणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

“बाल न्याय मंडळाच्या पुढच्या आदेशानुसार याप्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच पोलिसांकडून कोणती वेगळी वागणूक मिळाली असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. “पोलिसांनी या घटनेत भादंविचे 304 हे कलम लावले आहे, 304 अ लावलेले नाही. त्यामुळे प्रारंभीच कठोर भूमिका घेण्यात आली. या प्रकरणातील मुलगा हा 17 वर्ष 8 महिन्याचा आहे. पण, निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झाले, त्यानुसार, गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. तसेही पोलिसांनी आपल्या पहिल्याच अर्जात नमूद केले आहे. पण, बाल न्यायाधिकरणाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही. त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

‘…तर वरच्या न्यायालयात दाद मागणार’

“पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली. कायद्यानुसार, बाल न्यायाधीकरणाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते आणि त्यांनी फेरविचार केला नाही तर वरच्या न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे कायद्यानुसार, ती कार्यवाही करण्यात येत आहे. वरिष्ठ न्यायालयाने घेतलेली भूमिका पाहता निश्चितपणे बाल न्यायाधीकरण फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे”, असा विश्वास फडणीसांनी व्यक्त केला.

‘ते बार बंद करण्यात येतील’

“कुणालाही दारु पिऊन, बिनानंबरची गाडी चालविण्याचा आणि लोकांचे जीव घेण्याचा अधिकार नाही. या प्रकरणात न्याय निश्चितपणे होईल. बारचे जे परवाने देण्यात आले, तेथे परवान्यातील अटींचे पालन होते की नाही, हे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे अटींचे पालन करीत नसतील, ते बार बंद करण्यात येतील. शिवाय वय आणि ओळख याची पडताळणी केल्यानंतरच बारमध्ये प्रवेश दिला पाहिजे, याचेही काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. नाकाबंदी करुन ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहीम नियमितपणे राबवावी, याचेही निर्देश देण्यात आले आहेत. पालकांनी सुद्धा स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही”, याकडे लक्ष दिले पाहिजे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.