VIDEO: एका व्हिडीओ बॉम्बने सर्व चिडीचूप, फडणवीसांचा दुसरा बॉम्ब येतोय; चंद्रकांतदादांचा दावा

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला त्रास देता का?, मग आम्ही तुम्हाला त्रास देतो असं म्हणून हे सर्व सुरू आहे. त्यातील एक व्हिडीओ बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी टाकला. दुसरा व्हिडीओ बॉम्ब येतो आहे. एका व्हिडीओ बॉम्बने सगळं चिडीचूप झालं.

VIDEO: एका व्हिडीओ बॉम्बने सर्व चिडीचूप, फडणवीसांचा दुसरा बॉम्ब येतोय; चंद्रकांतदादांचा दावा
एका व्हिडीओ बॉम्बने सर्व चिडीचूप, फडणवीसांचा दुसरा बॉम्ब येतोय; चंद्रकांतदादांचा दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 12:30 PM

पुणे: केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला त्रास देता का?, मग आम्ही तुम्हाला त्रास देतो असं म्हणून हे सर्व सुरू आहे. त्यातील एक व्हिडीओ बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) टाकला. दुसरा व्हिडीओ बॉम्ब येतो आहे. एका व्हिडीओ बॉम्बने सगळं चिडीचूप झालं. दुसरा व्हिडीओ बॉम्ब तर खूपच स्ट्राँग आहे. त्यामुळे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही घारबणारे लोक नाहीत. चळवळीतील लोक आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठी संपूर्ण भाजप (bjp) आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं. त्यामुळे संपूर्ण जनता त्यांच्या पाठी आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील (chandrakant patil) मीडियाशी संवाद साधत होते. फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना काही घटनात्मक अधिकार आहे. संरक्षण आहे. त्यामुळे त्यांना सोर्स विचारले जाऊ शकत नाहीत, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणात कोण कोण आहे याची खोलात जाऊन चौकशी करण्याऐवजी देवेंद्रजींना बोलवत आहेत. कायद्याप्रमाणे त्यांच्या माहितीचा सोर्स त्यांना विचारता येणार नाही. ही माहिती कुठून मिळाली हे विचारण्यासाठी त्यांना चौकशीला बोलावलं आहे. लोकशाहीत सत्ताधारी पक्षावर अंकूश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची निर्मिती झाली. तसेच विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने अधिकार मिळाले. त्याला माहिती कुठून मिळते हे सांगू लागले तर ते सत्ताधाऱ्यांची प्रकरणं उघडच करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना कुठून माहिती मिळते हे विचारायचं नसतं. पण सगळंच अंधेर नगरी चौपट राजा असं चाललं आहे. आणि बुडत्याचा पाय खोलात चालला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

दूध का दूध, पानी का पानी होणार

हे प्रकरण सीबीआयकडे जाईल. सरकार हे प्रकरण सीबीआयकडे देऊ शकत नाही. कारण त्यांची यंत्रणा तपास करण्यास सक्षम नसल्याचं अधोरेखित होऊ शकतं. त्यामुळे आम्ही मागणी करायची असते त्यांनी नाही म्हणायचं असतं. एका दिवसात कोर्ट निर्णय देईल. जसं अनिल देशमुखांच्या वेळेला सीबीआयकडे चौकशी द्यायला तयार नव्हते. ज्योती पाटील नावाच्या कार्यकर्त्या न्यायालयात गेल्या. दोन मिनिटात सीबीआय चौकशी लागली. कोठडीतच गेले डायरेक्ट. या प्रकरणातही सीबीआयकडे प्रकरण जाईल आणि दूध का दूध पानी का पानी होईल, असं त्यांनी सांगितलं.

तुम्ही का घाबरला?

भाजपने कधीच नोटीस दिली नाही. मोदींना भाषण केलं. ते भाषण सर्वांनी पुन्हा पुन्हा ऐकावं. स्वायत्त संस्थांवर संशयाची सुई फिरवणं, न्यायालायवर अविश्वास दाखवणं हे लोकशाहीच्या मूळ गाभ्याला घातक आहे. आम्ही कुणाला नोटीस दिली नाही. सीबीआयने दिली असेल, ईडीने दिली असेल. त्यांची कार्यपद्धती आहे. नोटीस देणं ही तुमची कार्यपद्धती आहे. मग तुम्ही कशाला घाबरले. फडणवीस उत्तर द्यायला चालले होते. तरीही तुम्ही घाबरले. लाखो लोकं येतील असं माहीत होतं म्हणून घाबरले, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Devedra Fadnavis Live Blog : पोलिसांचं पथक ‘सागर’ बंगल्यावर दाखल; फडणवीसांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात

Maharashtra News Live Update : त्वचेच्या आरोग्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश हवाच…

इगतपुरीत दम मारो दम; पोलिसांचा रात्री 2 वाजता हुक्का पार्टीवर छापा, 70 जणांना बेड्या

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.