सुप्रिया सुळे यांच्यासमोर धनगर समाजाचे आंदोलक आक्रमक, थेट राजीनाम्याची मागणी

सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयालादेखील फोन केला. पण त्यानंतरही आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. याउलट आंदोलकांनी थेट सुप्रिया सुळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही आंदोलकांनी तर सुप्रिया सुळे भाजपचं काम करतात, असा आरोप केला. यावेळी आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.

सुप्रिया सुळे यांच्यासमोर धनगर समाजाचे आंदोलक आक्रमक, थेट राजीनाम्याची मागणी
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 6:43 PM

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे | 13 नोव्हेंबर 2023 : धनगर आरक्षणासाठी बारामतीत धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. धनगर सामाजाचे नेते चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला बसले आहेत. वाघमोडे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या नेत्यांना मोठा इशारा दिलाय. शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्या गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना अडवणार, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: उपोषणस्थळी जावून आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फोन लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर हा प्रश्न घालण्याची मागणी त्यांनी केली. तसेच तुम्ही कोणीतरी प्रशासकीय अधिकारी इथे पाठवा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली.

यावेळी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोन केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी श्रीकांत शिंदे यांना आपल्या वडिलांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडा, असं आवाहन केलं. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी आपण धनगर आरक्षणाच्या आंदोलनाची माहिती देऊ, असं आश्वासन दिलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण काही तरुण आंदोलक यांनी आक्रमक भूमिका मांडली.

सुप्रिया सुळे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

“50 दिवस होत आले. पण हालचाल दिसत नाही, असं बांधव म्हणत आहेत. हे ट्रिपल इंजिन सरकार आहे. यांना रस्ते बांधायला पैसे आहेत”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना फक्त आरक्षणावर बोला अशी विनंती केली. यावेळी एका आंदोलक तरुणाने सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला. “तुमचे आमदार सांगतात धनगर समाजाला आरक्षण दिलं तर मी राजीनामा देईन. नरहरी झिरवल हे आमदार घेवून गेले होते”, असं एक तरुण म्हणाला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी नरहरी झिरवळ आमच्या पक्षाचे नाहीत, असं स्पष्ट केलं.

“मी धनगर आरक्षणाबाबत मी संसदेत बोलले आहे. मी पुन्हा नंबर 1 आले आहे. ते माझ्यासाठी मंदिर आहे. मी तिथे खोटे बोलत नाही. मला देवाला जवाब द्यायचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल काय केला? तिथून खरी सुरुवात झाली. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देवू म्हणाले, काय झालं? ते भ्रष्ट आहेत. जुमलेबाज आहेत”, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

आंदोलक तरुणाची सुप्रिया सुळे यांच्या राजीनाम्याची मागणी

“तुमच्या खासदारांना माहिती आहे का, काय करायला पाहिजे?” असा सवाल एका धनगर तरुणाने केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, “आम्ही प्रपोजल आला की त्याला पाठिंबा देवू. सरकारला म्हणावं, एक दिवस सेशन घ्या.” त्यानंतर एका आंदोलकाने सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी मागणी केली. “तुम्ही राजीनामा द्या आणि आंदोलांची तीव्रता वाढवा”, अशी मागणी एका आंदोलकाने केली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. पण राजीनामा देवून प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. “या बारामतीत ६० हजार धनगर मतदार आहेत. आम्ही कधीच विरोध केला नाही. चौंडीला तुम्ही गेले पण इथे 5 दिवसांनी आले, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आंदोलकांमध्ये बाचाबाची

“धनगर समाज विषयी भूमिका जाहीर करा. अन्यथा बारामतीत आम्ही आमचा उमेदवार देणार. आतापर्यंत आमची फसवणूक झाली. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. तेव्हा शरद पवारांनी कधीच केंद्राला प्रस्ताव पाठवला नाही”, अशी भूमिका आक्रमक आंदोलकांनी मांडली. यावेळी धनगर समाजाच्या आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. “सुप्रिया सुळे भाजपचं काम करतात”, असा आरोप काही आंदोलकांनी केला.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. गोविंद बागेत उद्या शरद पवारांच्या भेटीसाठी येणाऱ्या नेतेमंडळींना अडवणार नाही, असा शब्द आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना दिला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या चर्चेला यश आल्याचं मानलं जात आहे.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.