Pune crime : दारूच्या पार्टीत वाद, एकाचा गळा दाबून खून; पिंपरी चिंचवडच्या दिघी पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

दारू पिण्याच्या वादातून त्यांचे भांडण झाले. त्या भांडणातच तिघांनी मिळून दीपकचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी खून करून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.

Pune crime : दारूच्या पार्टीत वाद, एकाचा गळा दाबून खून; पिंपरी चिंचवडच्या दिघी पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 9:52 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी (Dighi) परिसरात दारू पार्टीत वादाचे रुपांतर खून करण्यात झाले आहे. दारू पिण्याच्या वादातून एका 45 वर्षाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन जणांनी मिळून एकाचा खून केला आणि नदीत फेकून दिला आहे. देहू फाटा ते चाकण रोडवरील इंद्रायणी नदी घाटाजवळ मित्रांसोबत दारूची पार्टी सुरू असताना क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. तो टोकाला गेला. त्यातून दीपक या व्यक्तीची मित्रांनी त्याची हत्या केली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी (Dighi police) बंट्या, शिंदे मामा आणि माधव या तीन जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांना घटनास्थळाची पाहणी करून या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना अटक (Arrested) केली आहे.

तिघांना अटक

माधव अतरुषी साबळे (वय 30, मूळ रा. मु. पो. जांब अंध, ता. सेनगाव, जि. हिंगोली), सुधाकर उर्फ बंटी बबन वाघमारे (वय 30, मूळ रा. हिंगलजवाडी, जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर पुंडलिक शिंदे (वय 56, मूळ रा. मु. पो. हाडुलकी, ता. अहमदपूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार गणेश कळंके यांनी सोमवारी दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

गळा आवळून खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ ते सोमवापी सकाळी नऊदरम्यान इंद्रायणी घाटाजवळ आळंदी येथे एकजण बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला पोलिसांनी उपचाराकरिता पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन अहवालामध्ये त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक चौकशी केली असता मृताचे नाव दीपक असल्याचे समजते. दारू पिण्याच्या वादातून त्यांचे भांडण झाले. त्या भांडणातच तिघांनी मिळून दीपकचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी खून करून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. अधिक तपास दिघी पोलीस करीत आहेत.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.