Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ती गरिबीतून पुढे आली, तिला संपवू नका’, बड्या आमदाराचा गौतमी पाटील हिला पाठिंबा

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर एकीकडे बंदी घालण्याची मागणी होत आहे. तिच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. असं असताना एका बड्या नेत्याने गौतमी पाटील हिच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे.

'ती गरिबीतून पुढे आली, तिला संपवू नका', बड्या आमदाराचा गौतमी पाटील हिला पाठिंबा
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 11:42 PM

पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आडनावावरुन राज्यात वाद सुरु असताना आता खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीला पाठिंबा दिला आहे. गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आलीय. तिला संपवू नका, अस आवाहन दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे. विशेष म्हणजे गौतमी पाटील हिला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला होता. पण नंतर त्यांनी आपल्या भूमिकेबाबत यू टर्न घेतला. दुसरीकडे दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीचं कौतुक करत तिचं समर्थन केलं आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गर्दी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात होते, ऐवढा चाहाता वर्ग गौतमीचा झाला आहे. राज्यात आजकाल अनेकजण पाटील आडनाव लावत असल्याचे दाखले देत मोहिते पाटलांनी राज्यकर्त्यांना साद घालत गौतमीला संपवू नका, असे आवाहन केलंय. दिलीप मोहिते पाटील त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

दिलीप मोहिते पाटील नेमकं काय म्हणाले?

“गौतमी पाटील हिने पाटील नाव केलं तर तुमचं काय बिघडलं? तुम्ही तिला का ट्रोल करताय हे मला कळत नाहीय. ती नवीन कलाकार आहे. तिचं आयुष्य इतक्या लवकर संपवू नका, एवढीच माझी विनंती राहणार आहे. एखाद्या कलाकाराचं जीवन संपवू नका. ती अतिशय गरीब परस्थितीतून तिच्या कलेच्या माध्यामातून लोकांना कळली”, असं गौतमी पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“पिंपरी चिंचवडचे पोलीस अधिकारी आज तिच्या कार्यक्रमावरही बंदी घालतात की, तिच्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पण एक गोष्ट नक्की आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गर्दी तिच्या कार्यक्रमांना जमते”, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले.

संभाजीराजे यांचा यू टर्न

दुसरीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला गौतमीला पाठिंबा दर्शवलेला. पण नंतर त्यांनी ट्विटरवर गौतमीच्या विरोधात भूमिका मांडली.“छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिलं. त्यामुळे स्वातंत्र्य सर्वांना आहे. महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. त्यामुळे सर्वांनी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे, मी या मताचा आहे”, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. पण त्यानंतर काही तासांनी संभाजीराजे यांनी आपली भूमिका मागे घेतली. त्यांनी ट्विटरवर आपली सविस्तर भूमिका मांडली.

“काल एका पत्रकाराने एका महिलेचा कलाकार असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे”, असं संभाजीराजे आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले.

“मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची “कला” मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण”, अशी भूमिका संभाजीराजे यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये मांडली आहे.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.