अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे यांची शरद पवारांसोबत बैठक, चर्चेची बातमी आली बाहेर

| Updated on: Nov 10, 2023 | 12:58 PM

sharad pawar dilip walse meeting | अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील शुक्रवारी शरद पवार यांच्या भेटीला गेली. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत काय चर्चा झाली? याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना दिली. पाडवा भेट अजून ठरली नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे यांची शरद पवारांसोबत बैठक, चर्चेची बातमी आली बाहेर
sharad pawar dilip walse patil
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे | 10 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी वेगळा गट तयार केला. यावेळी शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांना साथ दिली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिलीप वळसे पाटील मंत्री झाले. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही, असे म्हटले जात होते. पण राज्यातील जनतेने शरद पवार यांना कधीच बहुमत दिले नाही. त्यांना स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. शरद पवार यांच्यासारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात,” असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले होते. आता दिलीप वळसे पाटील शुक्रवारी शरद पवार यांच्या भेटीला गेली. रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात नियोजित बैठकीत दोघांची भेट झाली.

काय झाले बैठकीत

दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. या बैठकीत कुठली ही राजकीय चर्चा झाली नाही. रयत शिक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या बदला संदर्भात किंवा माझ्या नावाचा बदल करण्यासंदर्भात काहीच चर्चा झाली नाही. आपण पवार साहेबांचे मार्गदर्शन नेहमी घेत असतो, असे दिलीप वळसे यांनी म्हटले. रयत शिक्षण संस्थेतील अनेक मुख्य पदांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाचे नेते अजूनही रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारिणीत आहे. यामुळे रयत शिक्षण संस्थेची कार्यकारणी बदलण्याची चर्चा होती. परंतु असे काहीच झाले नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. शरद पवार यांची पाडवा भेट कधी घेणार, ते अजून ठरलेले नाही, असे त्यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

२४ ग्रामपंचायती आमच्या

आपण अजून गावाला गेलो नाही. परंतु आंबेगाव तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमध्ये आमच्या विचारांचे सरपंच झाले आहेत. ४ ठिकाणी स्थानिक आघाडी तर २ ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळाले आहे. स्थानिक प्रश्नांमुळे काही बदल झाला आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.