Pune Dilip Walse Patil : कुटुंबाची परवड होऊ नये म्हणून कैद्यांना मिळणार कर्ज; पुण्यातल्या येरवड्यात दिलीप वळसे पाटलांनी केलं चेकचं वाटप

अनेक बंदिवान तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असून त्यांच्या कुटुंबीयांची परवड होऊ नये, त्यांना त्यांचा व्यवसाय, मुलांच्या शिक्षणाकरता मदत व्हावी, यासाठी बँकेच्यावतीने बंदीवानांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Pune Dilip Walse Patil : कुटुंबाची परवड होऊ नये म्हणून कैद्यांना मिळणार कर्ज; पुण्यातल्या येरवड्यात दिलीप वळसे पाटलांनी केलं चेकचं वाटप
कैद्यांना चेकचे वाटप करताना दिलीप वळसे पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 3:51 PM

पुणे : राज्यातील कारागृहांमध्ये बंदिवानाची संख्या वाढत असून याकरता राज्य सरकार लवकरच नवीन अत्याधुनिक कारागृह (Jail) बांधणार आहे. याकरता अर्थविभागही सकारात्मक आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. पुण्यातील येरवडा (Yerwada) जेलमधील बंदिवानांना महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा शुभांरभ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमप्रसंगी प्राथमिक स्वरुपात चेकचे वाटपही करण्यात आले. हा सुरुवातीचा टप्पा असून त्यात 222 पुरूष बंदिवान तर 7 महिला बंदिवानांना कर्ज देण्यात येणार आहे. त्यांना आवश्यक असलेले हे कर्ज दिले जाणार आहे. एकूणच यामुळे पैशाच्या अडचणीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासून या बंदिवानांना दिसाला मिळणार आहे.

प्राथमिक स्वरुपात चेकचे वाटप

अनेक बंदिवान तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असून त्यांच्या कुटुंबीयांची परवड होऊ नये, त्यांना त्यांचा व्यवसाय, मुलांच्या शिक्षणाकरता मदत व्हावी, यासाठी बँकेच्यावतीने बंदीवानांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यातर्फे यावेळी प्राथमिक स्वरुपात चेकचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक, कारागृह सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी आणि कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.

कुटुंबाची होते परवड

सुरुवातीच्या पहिल्या टप्यात येरवडा कारागृहातील 222 पुरूष तर 7 महिला बंदिवानांना आवश्यकतेनुसार कर्ज दिले जाणार आहे. कळत नकळतपणे गुन्हा घडलेला असतो. त्यानतंर त्या गुन्हेगारांस तुरुंगामध्ये येऊन शिक्षा भोगावी लागते. त्यात कुटुंबाची परवड होते. याकरता राज्य सरकारने बंदिवानांना कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच या राज्यात अनेक कारागृहामध्ये कैद्याना चांगल्या सुविधा देणे, त्यांचे मनोबल वाढविणे याकरता राज्य सरकार टाटा कंल्सटिंग ग्रुपच्यावतीने कैद्यांसाठी विशेष काम करणार आहे, अशी माहितीही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.