शिवसेनेची डोकेदुखी वाढली, पुण्यातला बडा पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

पुण्यात (Pune) शिवसेनेच्या ठाकरे गटातील (Thackeray Group) पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस असल्याची मोठी बातमी समोर आलीय. कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मतभेद आहेत.

शिवसेनेची डोकेदुखी वाढली, पुण्यातला बडा पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत
उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 8:29 PM

पुणे : पुण्यात (Pune) शिवसेनेच्या ठाकरे गटातील (Thackeray Group) पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस असल्याची मोठी बातमी समोर आलीय. कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba by election) पार्श्वभूमीवर शिवसेनेत (Shiv Sena) मतभेद आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्ररक्षक असलेले विशाल धनवडे (Vishal Dhanawade ) हे नाराज असल्याची माहिती समोर आलीय. कसबा पोटनिवडणुकीत पक्षात प्रोटोकॉल पाळला जात नाही, असा आरोप त्यांनी केलाय. विशेष म्हणजे धनवडे यांचा शहराध्यक्षांसोबत वाद झालाय. त्यामुळे आता ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि संपर्कप्रमुख सचिन अहिर उद्या पुण्याला जाणार आहेत. या दरम्यान विशाल धनवडे हे सचिन अहिर यांच्याकडे राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

विशाल धनवडे हे शिवसेनेचे नगरसेवक राहिले आहेत. ते कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. या दरम्यान पक्षाच्या शहराध्यक्षांसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय. धनवडे यांनी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार, असा व्हॉट्सअॅप मेसेज केलाय.

शिवसेनेची डोकेदुखी वाढली

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. कारण पिंपरी चिंचवड आणि कसबामधील स्थानिक पदाधिकाऱ्यांची पोटनिवडणुकीसाठी तयारी होती. त्यासाठी काहीजण उत्सुकही होते. पण महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी दोन्ही जागा देण्याचं ठरलं.

विशेष म्हणजे शिवसेना चिंचवडच्या जागेसाठी जास्त आग्रही होती. खासदार संजय राऊत यांनी त्यासाठी हट्ट धरला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसला ती जागा हवी होती. तर कसब्याच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती.

अखेर तीनही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेअंती राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासाठी दोन्ही जागा निश्चित झाल्या. पण यामुळे शिवसेना पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे.

ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी चिंचवडमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाकडून समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठीच ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर स्वत: त्यासाठी पुण्याला जाणार आहेत.

दुसरीकडे राहुल कलाटे यांनी काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मी जनभावनेचा अनादर करु शकत नाही, असं राहुल कलाटे म्हणाले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.