Pune News | दहा लाख पुणेकरांनी केली नोंदणी, 13 दिवसांचे काय आहे अभियान
pune do dhage sri ram ke liye drive| पुणे शहरात एक मोठे अभियान सुरु झाले आहे. या अभियानात लाखो लोक सहभागी झाले आहेत. त्यासाठी दहा लाख लोकांची नोंदणी झाली आहे. या अभियानास 'दो धागे श्री राम के लिए' नाव दिले आहे. तब्बल तेरा दिवस हे अभियान चालणार आहे.
पुणे | 11 डिसेंबर 2023 : पुणे शहरात एक अभियान सुरु झाले आहे. या अभियानासाठी लाखो पुणेकरांनी नोंदणी केली आहे. 13 दिवस हे अभियान चालणार आहे. पुणे येथील हेरिटेज हँडविव्हींग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रकडून हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानास ‘दो धागे श्री राम के लिए’ नाव दिले आहे. 10 डिसेंबरपासून सुरु झालेले हे अभियान 13 दिवस चालणार आहे. त्यासाठी दहा लाख पुणेकरांनी नोंदणी केली आहे. लाखो लोकांनी नोंदणी केलेले या अभियानाची चर्चा देशभर होत आहे. या अभियानामुळे हस्तकला आणि हातमाग उद्योगास प्रोत्साहन मिळणार आहे.
दहा लाख लोकांची नोंदणी
पुणे शहरात सुरु असलेल्या ‘दो धागे श्री राम के लिए’ यासाठी 10 लाख लोकांची नोंदणी झाल्याची माहिती अभियानाचे आयोजक अनघा घैसास यांनी दिली. अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील भगवान रामचे वस्त्र तयार करण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यात अयोध्यात निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिरातील भगवान श्रीरामाचा पोशाख पुणे येथून विणून घेण्याचे काम सुरु झाले आहे. हा सर्व उपक्रम लोकसहभागातून केला जात आहे. हस्तकलेस प्रोत्साहन देणे हा ही या उपक्रमाचा उद्देश आहे. हातमाग हा साधारण नाही. ही चांगली कला आहे. त्यासाठी गणित आणि संयमाची गरज आहे. एखाद्या अभियंत्यासारखे हा काम आहे, असे घैसास यांनी सांगितले.
कशापासून होत आहे रामलल्लाचे वस्त्र तयार
अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी रामलल्याचे वस्त्र रेशमपासून तयार केले जात आहे. तसेच चांदीच्या जरीने ते सजवण्यात येणार आहे. या अभियानात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनीही सहभाग घेतला. यामुळे या अभियानाला अधिक बळ मिळाल्याचे अनघा घैसास यांनी सांगितले. यावेळी बोलताना गोविंदगिरी महाराज यांनी अनघाताईंनी सुरु केलेला हा उपक्रम कौतूकास्पद असल्याचे सांगितले.