2021 Year End Eve | 31डिसेंबरला पार्टी करतायत … मग मद्यपान परवाना घ्यायला विसरू नका ; असा मिळवा ऑनलाईन मद्यपान परवाना

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यपान परवाने दिले जातात. यामध्ये एका दिवसापासून ते वर्षभरासाठी हा परवाना घेता येतो. इतकंच नव्हे तर आजीवन मद्यप्राशनाचा परवानाही मिळतो.

2021 Year End Eve | 31डिसेंबरला पार्टी करतायत ... मग मद्यपान परवाना घ्यायला विसरू नका ; असा मिळवा ऑनलाईन मद्यपान परवाना
उल्हासनगरचा 'चांदनी डान्सबार' अखेर सील
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 12:06 PM

पुणे – नवीन वर्षाच्या स्वागताला अगदी काही तासाच उरले आहे. कोरोनाचा धोका असला तरी नवीन वर्षाचे दमदार स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. अनेक बेतही ठरले आहेत. मात्र नववर्षाच्या पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष असणार आहे. यासाठी  राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच विशेष पथकांची नेमणूक केली आहे.

अशी करणार पाहणी शहर व शहरातील परिसरात मद्याच्या विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये. यासाठी ही पथके पाहणी करणार आहेत . संशयित ठिकाणी या छापे टाकले जाणार आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील विविध उपाहारगृह , हॉटेल्स येथे पार्ट्यांचे आयोज केले जाते. अश्या ठिकाणी भेसळ युक्त मद्यविक्री करण्यावरही भर दिला जातो. अशाच भेसळ युक्त मद्यविक्रीला रोख लावण्यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. पार्ट्यांमध्ये आणण्यात आलेल्या मद्याचा दर्जा , मद्य पुरविणारे ठिकाण याची माहिती यापथकांकडून घेतली जाणार आहे.

मद्य पिण्यासाठी परवाना घेणे आवश्यक

31 डिसेंबरला मद्य पिणाऱ्यांची संख्या जास्त असते. मात्र मद्यपान परवाना न घेताच नागरिक मद्यसेवन केले जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यपान परवाने दिले जातात. यामध्ये एका दिवसापासून ते वर्षभरासाठी हा परवाना घेता येतो. इतकंच नव्हे तर आजीवन मद्यप्राशनाचा परवानाही मिळतो. मात्र विना परवाना मद्य प्राशन केलेला कोणी आढळल्यास त्यांच्यसह हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे मद्य परवाना घेणे आवश्यक आहे.

कोरोनाची अशी आहे नियमावली

ओमिक्रॉन व कोरोनाच्या पार्श्वभूमी हॉटेलचे नियम कडक करण्यात आले आहेत. रात्रीनऊ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उपाहारगृहे आणि बिअरबारमध्ये 50  टक्के ग्राहकांच्या उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याच्यावरही कारवाई होणार आहे.

असा मिळवा ऑनलाईन मद्यपान परवाना

  •  वर्षभराचा किंवा आजीवन मद्यपान परवाना   https://exciseservices.mahaonline.gov.in   या वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर   देण्यात येतात.
  •  त्यासाठी संबंधित व्यक्तीला स्वत:चे दोन फोटो,
  • फोटो असलेले ओळखपत्र आणि निवासाचा पुरावा द्यावा लागतो.
  • आधारकार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड आणि वाहन परवाना यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दिल्यास मद्यपान परवाना मिळू शकेल.
  • संबंधितांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना डिजिटल स्वाक्षरी असलेले परवाने देण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

मद्यपान परवान्याचे हे आहेत दर

  1. देशी मद्य – दोन रुपये (एक दिवसासाठी)
  2. देशी मद्य – पाच रुपये (एक दिवसासाठी)
  3. वर्षभरासाठी – 100 रुपये
  4. आजीवन – एक हजार रुपये

work from home | मुलांसोबत राहून कठीण जातोय वर्क फ्राम होम; या पाच टिप्स तुमचे काम करतील सोपे

‘मुझे आपसे प्यार हो गया और…’, नुसरत जहाँने पहिल्यांदाच सांगितली यश दासगुप्तासोबतची ‘लव्हस्टोरी’

सिंगल चार्जमध्ये 150KM रेंज, One-Moto ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.