पुण्यात ड्रग्जच्या पार्ट्याचा पर्दाफाश; एकाच दिवसांत 26 बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलवर कारवाई
पुण्यात ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत पब आणि बारवर बुल्डोजरनं कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पुण्यात जोरदार कारवाई सुरु झालीये.
पुणे ड्रग्जच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनधिकृत पब आणि बारवर बुल्डोजरनं कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर कारवाई सुरु झालीये. संजय राऊतांनी पुणे आणि नाशिकमध्ये गुजरातमधून ड्रग्ज येत असल्याचा आरोप करुन खळबळ उडवलीये. पुण्यात पब आणि बारमध्ये ड्रग्जच्या पार्ट्याचा पर्दाफाश झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं बुल्डोजर कारवाई सुरु झाली. अनधिकृत पब आणि बार वर तोडफोडची कारवाई सुरु झालीय. मात्र, संजय राऊतांनी स्फोटक आरोप केलेत. पुणे आणि नाशिकमध्ये गुजरातमधून ड्रग्ज येत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.
पुण्यात L3 लिक्विड लिजर लाऊज पब मध्ये अल्पवयीन तरुण तरुणी ड्रग्ज घेत असल्याचे व्हिडीओ समोर आले. त्यानुसार L3 पबसह इतर पब आणि बारवरही पुणे महापालिकेचा हातोडा चालला. मात्र दोषी अधिकारी आणि पब मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन जेलमध्ये टाका. नाही तर ही कारवाई खोटी असल्याचं काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
पुण्यातल्या ज्या L3 पबमध्ये पार्टी झाली. त्या पार्टीतील आतापर्यंत चौघांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पार्टीतले काही तरुण मुंबईतलेही होते.
फर्ग्युसन रोडवरील L3 पबमध्ये रविवारी ड्रग्ज पार्टी झाली. सुरुवातीला तरुणांची क्लर्ट हॉटेलमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत पार्टी झाली. क्लर्ट हॉटेलच्या पार्टीनंतर इव्हेंट मॅनेजर अक्षय कामठे, डीजे चालक दिनेश मानकरनं L3मध्ये फोन केला. एका ग्रुपला नाईट पार्टी करायची असून ते पैसे देण्यास तयार असल्याचं सांगितलं. यानंतर बंद झालेला L3 पब पुन्हा रात्री दीड वाजता उघडला. 40-50 जणांकडून मध्यरात्री दीड ते 5 पर्यंत ड्रग्ज पार्टी झाली.
मात्र आता कारवाई नंतर जागेचे मालक पुढे आलेत…ज्यांना पब, हॉटेल चालवण्यास दिले..त्यांनी इंटेरिअर बदल केले..बेकायदेशीर बांधकाम नाही असं या मालकांचं म्हणणं आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या कारवाईच्या आदेशानंतर पुणे महापालिकेनं एकाच दिवसांत 26 बार रेस्टॉरंट, हॉटेलवर कारवाई केलीये. ज्यात हॉटेल द अर्बन हारवेस्ट, 7 A रेस्टॉरंट बार, माफिया बार, बटर अँड बारचा समावेश आहे.