pune pub: पुण्यातील पबमध्ये पूल पार्टी, तरुण-तरुणी स्विमिंग पूलमध्ये बेधुंद

| Updated on: May 23, 2024 | 5:04 PM

pune pub: पुण्यात बेरात्री सुरू असलेल्या पब संदर्भात विषय गंभीर होत आहे. परंतु परिसरातील या पबवर ठोस कारवाई होत नाही. पुणे ग्रामीण पोलीस यावर कारवाई करणार का? असा प्रश्न समाजातील सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

pune pub: पुण्यातील पबमध्ये पूल पार्टी, तरुण-तरुणी स्विमिंग पूलमध्ये बेधुंद
pub (file Photo)
Follow us on

पुणे शहरात नवीन निर्माण झालेल्या पब संस्कृतीची चर्चा आता जोरात होऊ लागली आहे. पुण्यातील बडे बिल्डरचा अल्पवयीन मुलाने पबमध्ये पार्टी केली. त्यानंतर रस्त्यात दोघांना चिरडले. पुण्यात रात्रभर सुरु असणाऱ्या या पबविरोधात आवाज उठवला जात असताना एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील नामांकित पबमध्ये झालेल्या “पूल पार्टी” चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सांस्कृतिक पुण्यात आता संस्कृती शिल्लक राहिली नाही? असा प्रश्न सुज्ञ पुणेकरांना पडला आहे.

स्विमिंग पूलमध्ये बेधुंद तरुण-तरुणी

पुणे शहर कधीकाळी आपल्या संस्कृतीमुळे ओळखले जात होते. आजही पुणेकर आपली संस्कृती टिकवून आहेत. परंतु काळाप्रमाणे आलेल्या पब संस्कृतीमुळे पुण्यातील नको तो प्रकार समोर येऊ लागला आहे. पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब संदर्भात आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील भूगाव परिसरात असलेल्या टिपसी टरटलमध्ये रंगली “पूल पार्टी”चा हा व्हिडिओ आहे. पार्टीमध्ये तरुण, तरुणी स्विमिंग पूलमध्ये बेधुंद होऊन नाचताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

रात्रीच्या पुण्यात कारवाई होणार कधी

पुण्यात बेरात्री सुरू असलेल्या पब संदर्भात विषय गंभीर होत आहे. परंतु परिसरातील या पबवर ठोस कारवाई होत नाही. पुणे ग्रामीण पोलीस यावर कारवाई करणार का? असा प्रश्न समाजातील सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एका अपघातानंतर सर्वच राजकीय पक्ष पुणे शहरातील पब संस्कृतीसंदर्भात बोलू लागले आहे. परंतु या पब संस्कृतीला नियमात आणण्याचा कोणताही उपाय केला जात नाही. यामुळे पुणेकरांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

पुण्यात पब संस्कृती चालणार नाही- मुरलीधर मोहोळ

पुणे शहरातील पब हा विषय राजकारणाचा नाही. प्रत्येक पुणेकर या प्रकरणात गंभीर आहेत. शहराच्या संस्कृतीचे नाव लौकीक आहे. परंतु काही जणांकडून स्टंटबाजी होत आहे. काँग्रेस आमदार नेहमी स्टंट करत करत आहे. पुण्यात पब संस्कृती चालणार नाही ही पुण्याची भूमिका आहे, असे पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.