Ed action : ईडीनं जप्त केली पुण्यातल्या ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची साडेआठ कोटीच्या मालमत्ता
मुश्ताक शेख यांच्या तक्रारीनुसार ईडीने ट्रस्टच्या ताब्यातील रक्कम आणि निवासी जमीन अशी आठ कोटींची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारूक पठाण यांच्यावर गुन्हा दाखल व्हायल हवा, अस तक्रारदार मुश्ताक शेख यांच म्हणणे आहे.
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या इम्तियाज मोहम्मद प्रकरणामध्ये ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टच्या (TIET) बँक खात्यात जमा झालेली दीड कोटी रुपयांची रक्कम व सात कोटी 17 लाख रुपयांचे निवासी अपार्टमेंट अशी आठ कोटी 67 लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ED) जप्त केली आहे. या प्रकरणी मुश्ताक अहमद शेख यांनी ईडीकडे 3 नोव्हेंबर 2021ला तक्रार केली होती. हिंजवडीतील माण येथील वक्फ बोर्डाच्या ताब्यात असणारी ही जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकवण्यात आली असल्याची तक्रार बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police) दाखल आहे. मुश्ताक शेख यांच्या तक्रारीनुसार ईडीने ट्रस्टच्या ताब्यातील रक्कम आणि निवासी जमीन अशी आठ कोटींची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारूक पठाण यांच्यावर गुन्हा दाखल व्हायल हवा, अस तक्रारदार मुश्ताक शेख यांच म्हणणे आहे.
विविध कारणांसाठी वळती केली रक्कम
या प्रकरणाचा तपास ईडीकडे गेल्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर या प्रकरणामध्ये ट्रस्टच्या बँक खात्यामध्ये जमा असलेली दीड कोटी रुपयांची रक्कम तसेच निवासी सदनिका खरेदी करण्यासाठी आणि वैयक्तिक लाभासाठी बँक खात्यात रक्कम वळती केली होती.