आई-वडील बाजारात, घरात बहिणीसोबत खेळत होती झोपाळा, 8 वर्षीय चिमुकलीचा गळफास बसून मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील रुपीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे झोपाळा खेळताना आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ओढणीच्या सहाय्याने झोपाळा खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडलीय.

आई-वडील बाजारात, घरात बहिणीसोबत खेळत होती झोपाळा, 8 वर्षीय चिमुकलीचा गळफास बसून मृत्यू
Death
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 8:37 PM

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील (pimpri chinchwad) रुपीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली असून झोपाळा खेळताना आठ वर्षीय चिमुकलीचा (eight year old girl)मृत्यू झाला आहे. ओढणीच्या सहाय्याने झोपाळा खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडलीय. विशेष म्हणजे चिमुकलीच्या बहिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात तिला यश आले नाही. (eight year old girl died while playing in pimpri chinchwad pune)

चिमुकली ओढणीच्या मदतीने झोपाळा खेळत होती 

मिळालल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील रुपीनगर येथे आठ वर्षांची चिमुकली तिच्या घरात खेळत होती. तिचे आई-वडील बाजारात गेल्यामुळे घरात चिमुकली आणि तिची बहीण असे दोघेच होते. यावेळी दोन्ही बहिणींनी घरातील ओढणीच्या मदतीने झोपाळा तयार केला. या झोपाळ्यावर आठ वर्षीय मुलगी खेळत होती. मात्र, या ओढणीचा चिमुकलीला गळफास लागला. त्यातच आठ वर्षांची मुलगी गुदमरायला लागली.

उपचार सुरु करण्यापूर्वीच मृत्यू

हा प्रकार पाहून तिच्या बहिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. लोकांनीही येऊन चिमुकलीचा गळफास काढण्यासाठी जमेल ते प्रयत्न केले. त्यानंतर मुलीला वायसीएम रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे पिंपरी चिंचवडमध्ये शोककळा पसरली आहे.

औरंगाबादेत पतीने चिरला स्वत:चाच गळा

दरम्यान, औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर एका पतीने आपल्या पत्नीसमोरच धक्कादायक कृत्य केलं आहे. पतीने बसस्थानकावर आपली पत्नी समोर उभी असताना स्वत:चा गळा धारदार शस्त्राने चिरून घेतला. ही घटना सोमवारी (30 ऑगस्ट) मध्यरात्री घडली. या घटनेनंतर  एकच खळबळ उडाली असनू जखमी पतीला औरंगाबादच्या शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी पतीचे नाव भाऊसाहेब काकडे तर पत्नीचे राणी काकडे असे आहे. काकडे यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

इतर बातम्या :

पाणी पुरीवरुन पती-पत्नीमध्ये क्षुल्लक वाद; पत्नीचे टोकाचं पाऊल, विष प्राशन करुन आत्महत्या

बाळूमामाचे वंशज म्हणवणाऱ्या मनोहर मामांवर फसवणुकीचा आरोप, बारामतीत तक्रार; आता मनोहर मामांचं स्पष्टीकरण

पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीची प्रेयसी समोरासमोर आल्याने राडा; हाणामारीत प्रियकराचा मृत्यू

(eight year old girl died while playing in pimpri chinchwad pune)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.