Eknath Shinde : पुणे शहरात बॅनरबाजी, अजित पवार यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचे बॅनर
Eknath Shinde Pune : राज्यात अनेक नेत्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला जातो. त्यासंदर्भातील बॅनर लावले जातात. पुणे शहरात लावलेल्या बॅनरची चांगलीच चर्चा होत असते. आता एकनाथ शिंदे यांचे बॅनर पुणे शहरात लागले आहे...
पुणे | 10 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे बॅनर पुणे शहरात रविवारी लागले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. मेहनती, प्रामाणिक, निडर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा आशयाचे बॅनर लावले गेले आहे. अजित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी झाली असताना मुख्यमंत्र्यांचेही बॅनर्स झळकले आहे. त्यामुळे शिवसेना आणि अजित पवार गटात बॅनरबाजीवरून चढाओढ दिसत आहे. दोन्ही गटाच्या या बॅनरची पुणे शहरात चर्चा सुरु आहे.
सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न द्या
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या, अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी पुणे शहरात स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटा राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारसोबत सत्तेत आहे.
पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल
पुणे मेट्रोचा वेळापत्रकात रविवार एक दिवसासाठी आज १० सप्टेंबर रोजी बदल करण्यात आला. पुणे मेट्रो रविवारी एक तास उशिराने धावली. तांत्रिक कारणास्तव पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. यामुळे दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो प्रवासी सेवा सकाळी 7 वाजल्यापासून सुरु होणार आहे. वनाज मेट्रो स्टेशन ते गरवारे आणि सिव्हील कोर्ट ते रूबी हॉल स्टेशन या दोन्ही मेट्रो 1 तास उशीराने धावणार आहे.
पुणे शहरात राज ठाकरे यांच्या मनसेचा उपक्रम
पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गणपती तुमचा किंमतही तुमचीच या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी झाला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यात मनसे नेते प्रल्हाद गवळी यांच्यातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमात नागरिकांना आवडलेली गणपतीची मूर्ती त्यांना त्यांनी ठरवलेल्या किंमती नुसार विकण्यात येते.
पिंपरी-चिंचवडमधील डोळ्यांची साथ आटोक्यात
पिंपरी, चिंचवड शहरात डोळे येण्याची साथ नियंत्रणात आली आहे. गेल्या दहा दिवसांत केवळ 96 रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात हे प्रमाण पाच हजारांच्या आसपास होते. जुलैमध्ये आळंदीमधून सुरू झालेली डोळे येण्याच्या साथीचा ऑगस्टमध्ये वेगाने प्रसार झाला होता.