Pune News| पुणे-दौंड प्रवास होणार वेगवान…रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना होणार फायदा

pune daund railway | पुणे ते दौंड असा प्रवास रोज हजारो प्रवासी करतात. आता लवकरच पुणे दौंड प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासूनची त्यांची मागणी पूर्ण होणार आहे. यामुळे प्रवास वेगवान होणार आहे.

Pune News| पुणे-दौंड प्रवास होणार वेगवान...रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना होणार फायदा
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 1:51 PM

पुणे | 15 ऑक्टोंबर 2023 : पुणे ते दौंड नियमित ये-जा करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. नियमित काम आणि नोकरी निमित्त अनेक जण प्रवास करतात. अनेक विद्यार्थी दौंडवरुन पुण्याला शिक्षणासाठी येतात. या सर्वांना रेल्वे हाच महत्वाचा आधार असतो. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये बदल करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. प्रवाशांची ही मागणी मान्य झाली आहे. लवकरच पुणे ते दौंड दरम्यान इलेक्ट्रीक लोकल धावणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आला आहे.

काय होणार बदल

सध्या पुणे-दौंड मार्गावर डेमू (डिझेलवरील) गाड्या सुरु आहेत. या गाड्यांचे रुपातंर पुणे-लोणावळा लोकलसारखे करण्यात येणार आहे. म्हणजेच डेमू ऐवजी इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या मेमू गाड्या सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पुणे ते दौंड दरम्यान वाहतुकीचा वेग वाढणार आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक चांगली रेल्वेसेवा मिळणार आहे. या मार्गावर मेमू गाड्या सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी यामुळे पूर्ण होत आहे.

मार्गाचे विद्युतीकरण झाले पण…

पुणे ते दौंड मार्गाचे विद्युतीकरण होऊन चार वर्षे झालीत. या मार्गावर लोकलची म्हणजे मेमू गाड्याची चाचणीही घेण्यात आली होती. मात्र अजूनही इलेक्ट्रिक लोकल सुरू झालेली नाही. यासंदर्भात प्रवासी संघटना सातत्याने लोकप्रतिनिधी आणि रेल्वेकडे मागणी करत होती. त्यानंतर आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. यामुळे या मार्गावर लवकरच इलेक्ट्रीक लोकल धावणार आहे.

काय होणार फायदा

मेमू म्हणजे इलेक्ट्रिक लोकल सुरु झाल्यामुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. कमी वेळेत पुणे ते दौंड आंतर गाठता येणार आहे. डिझेल ऐवजी इलेक्ट्रीक इंजिन वापल्यामुळे इंधनाची बचत होणार आहे. लोणावळा लोकलसारख्या १२ डब्यांचा या गाड्या असणार आहेत. यामुळे प्रवाशी संख्याही वाढणार आहे. लवकरच या गाड्या सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी दिली. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.