Tesla India Pune । अखिल भारतीय टेस्ला सेनेची पहिला शाखा पुण्यात

Elon Musk Pune : टेस्ला भारतात येण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारकडून विशेष सवलतीचा कंपनीचा आग्रह आहे. अद्याप याविषयी निर्णय झालेला नाही. पण पुण्यातून एलॉन मस्क यांनी त्यांच्या भारत प्रवेशाचा श्रीगणेशा केला आहे.

Tesla India Pune । अखिल भारतीय टेस्ला सेनेची पहिला शाखा पुण्यात
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 8:53 AM

पुणे | 03 ऑगस्ट 2023 : भारतात इलेक्ट्रिक वाहन बाजारात (Electric Vehicle Market) मांड ठोकण्यासाठी टेस्ला ही जागतिक कंपनी उत्सूक आहे. कंपनीचा सीईओ आणि मालक एलॉन मस्क (Elon Musk) याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तशी ग्वाही पण दिली. भारतासह आशियातील इलेक्ट्रिक बाजारपेठेवर टेस्लाला (Tesla Company) लक्ष केंद्रीत करत आहे. कंपनी भारतात मोठ्या गुंतवणुकीच्या तयारीत आहे. केंद्र सरकारकडून विशेष सवलतीचा कंपनीचा आग्रह आहे. अद्याप याविषयी निर्णय झालेला नाही. पण कंपनीने एक पाऊल पुढे टाकले आहे. पुण्यातून (Pune City) भारत प्रवेशाचा कंपनीने श्रीगणेशा केला आहे. यापूर्वी कंपनी दक्षिणेतील राज्यात प्रकल्प उभारणीच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत्या. पण कंपनीने पुण्यात तंबू ठोकला आहे. नेमकी या घडमोडीमागील टेस्लाची योजना तरी काय?

पुण्यात कंपनीचे ऑफिस

भारतात इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेशासाठी टेस्लाचे प्रयत्न सुरु आहेत. टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पुण्यात पंचशील बिझनेस पार्कमध्ये कार्यालय (Elon Musk Tesla Office) थाटणार आहे. त्यासाठी त्यांनी भाडे तत्वावर कार्यालय पण घेतले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांशी चर्चेनंतर टेस्लाने हे पाऊल टाकले. कंपनीच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक कार विक्रीबाबत टेस्ला आग्रही असल्याचे स्पष्ट होते.

हे सुद्धा वाचा

5 वर्षांसाठी ऑफिस

टेस्लाची भारतातील सहायक कंपनीने हे कार्यालय पाच वर्षांसाठी भाडे तत्वावर घेतले आहे. पुण्यातील पंचशील बिझनेस पार्कमधील बी विंगच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय आहे. हे कार्यालय 5,580 चौरस फुट इतके आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटिडे सोबत त्यासाठी करार झाला आहे.

दरवर्षी वाढेल 5 टक्के भाडे

1 ऑक्टोबर, 2023 रोजी पासून हा करार सुरु होईल. दरवर्षी किरायात 5 टक्के दरवाढीला सहमती देण्यात आली आहे. 36 महिन्यांचा लॉक-इन परियड असेल. कंपनीला वाटल्यास 5 वर्षांनंतर करारनामा पुढे आणखी वाढविण्यात येऊ शकतो.

किती आहे भाडे

रिअल इस्टेट एनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्सने कागदपत्रांच्याआधारे या ऑफिसचे भाडे किती आहे, त्याची माहिती दिली आहे. हिंदुस्थान टाईम्सनुसार, टेस्लाने 60 महिन्यांसाठी हा करार केला आहे. 11.65 लाख रुपये मासिक भाडे असेल आणि अनामत रक्कम 34.95 लाख रुपये द्यावी लागेल. पंचशील बिझनेस पार्कचे काम सुरु असून ते 10,77,181 चौरस फुट आहे. पुण्यातील विमानतळापासून ते हाकेच्या अंतरावर म्हणजे तीन किलोमीटर दूर आहे.

चीनमधून भारताकडे

इकॉनॉमिक टाईम्समधील एका रिपोर्टनुसार, भारत सरकार टेस्लाला लवकरच वाहन निर्मितीसाठी प्रकल्प सुरु करण्यास मंजूरी देऊ शकते. चीनमधून अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सध्या इंडोनेशिया, मलेशिया आणि भारतात प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

चार वर्षांपूर्वी कंपनीची स्थापना

टेस्लाने 2019 मध्ये बेंगळुरुत त्यांच्या भारतातील सहायक कंपनीची नोंदणी केली होती. भारतात इलेक्ट्रिक वाहन आणि ईव्ही बॅटरी तयार करण्यासाठी एक कारखाना सुरु करण्याची योजना होती.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.