Pune Crime |पुण्यात उद्योजकाला गंडा ; अस्तित्वात नसलेली जमिनीची लाखो रुपयांना विक्री

| Updated on: Jan 17, 2022 | 10:22 AM

केंजळ बंधूंनी अस्तित्वात नसलेल्या जागा फेरफार करून 25 आर जागा 85 लाखाला विकल्याचे दिसून आले. तसेच खरेदी खतापोटी घेतलेले पैसे, स्टँप ड्युटी, वकील फी असे एकूण 96 लाख 15 हजार 940 रुपयांची फिर्यादीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

Pune Crime |पुण्यात उद्योजकाला गंडा ; अस्तित्वात नसलेली जमिनीची लाखो रुपयांना विक्री
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us on

पुणे – पुण्यात जामीन खरेदीच्या व्यवहारात उद्योजक मिलिंद महाजन यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या याप्रकरणी पोलिसांनी गणेश केंजळे व महेश केंजळे या दोन भावांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली असून दोघांनाही पोलिसानी अटक केली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी केंजळे बंधूना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमक काय घडल

भोसरी येथील लघुउद्योजक मिलिंद महाजन यांनी 2011 मध्ये गणेश व महेश केंजळे यांचेकडून मुळशी तालुक्यातील भुकूम येथील जमीन खरेदी केली . जमीन गट नं. 306 मधील 25 गुंठे जागा विकत घेतली होती. 85 लाख रुपयांत हा व्यवहार ठरला. त्यानुसार खरेदीखत झाले. खरेदीखताप्रमाणे केंजळे यांनी एक महिन्याच्या आत 7/12 वर महाजन यांचे नाव लावले नाही. त्यानंतर फिर्यादी महाजन यांनी आजारपणात उपचारासाठी ही जमीन विकायची ठरवली. मात्र विक्री करता असताना ग्राहकांना महाजन यांचे नाव 7 /12 असून त्यांच्यापुढे क्षेत्र शिल्लक नसल्याचे आढळले. गट न. 306 मध्ये जागेचे क्षेत्र केवळ 3 हेक्टर 58  आर असताना 4  हेक्टर 11 आर एवढी जागा कागदोपत्री विकल्याचे तलाठी यांच्या अहवालात स्पष्ट झाले. त्यानुसार तहसीलदारांनीही निकाल दिला.

अस्तित्वात नसलेल्या जागेची विक्री

आरोपी केंजळ बंधूंनी अस्तित्वात नसलेल्या जागा फेरफार करून 25 आर जागा 85 लाखाला विकल्याचे दिसून आले. तसेच खरेदी खतापोटी घेतलेले पैसे, स्टँप ड्युटी, वकील फी असे एकूण 96 लाख 15 हजार 940 रुपयांची फिर्यादीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे अधिक तपास करत आहेत.

Antelopes Fighting : जामदरा घोटी शेतशिवारात रंगली दोन काळविटांची झुंज, पाहा Video

Kolhapur | ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी पाटील यांची प्रकृती गंभीर; खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Corona Cases India : देशात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, मृत्यूसंख्येत वाढ झाल्यानं टेन्शन वाढलं