पुणे जिल्ह्यात नवीन आजाराचा उद्रेक, आरोग्य यंत्रणेची धावपळ, शाळा बंद करण्याचा प्रस्ताव

Pune News : पुणे जिल्ह्यात शाळकरी मुलांमध्ये आजाराची नवीन साथ आली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ उडली आहे. ही साथ आटोक्यात आली नाही तर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात नवीन आजाराचा उद्रेक, आरोग्य यंत्रणेची धावपळ, शाळा बंद करण्याचा प्रस्ताव
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 11:41 AM

योगेश बोरसे, पुणे | 21 जुलै 2023 : पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून नवीन आजाराची साथ सुरु झाली आहे. ही साथ गंभीर होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि जिल्हा शल्य चिकित्सक साथ असलेल्या आळंदीत जाणार आहे. तसेच ही साथ आटोक्यात आली नाही तर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभाग प्रशासनाला देणार आहे. चारच दिवसांत 1560 रुग्ण या साथीचे आढळले आहेत.

कोणती साथ झाली सुरु

पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपालिकेत डोळ्यांची साथ सुरु झाली आहे. आळंदी येथील वारकरी मुलांच्या बुबुळांना त्रास होत आहे. आळंदीतील विविध संस्थानामध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये डोळ्याच्या साथीचा मोठा प्रादुर्भाव गेल्या चार दिवसांपासून सुरु झाला आहे. चार दिवसांत तब्बल 1560 रुग्ण समोर आले आहे. या आजाराचे सोमवारी 450 रुग्ण आढळले. त्यानंतर मंगळवारी संख्या जवळपास दुप्पट वाढत नवे रुग्ण 740 झाली. पुन्हा बुधवारी 210 रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी 160 रुग्ण आढळून आले आहेत.

NIV चे एक पथक जाणार

आळंदीत शाळकरी मुलांमध्ये आलेल्या साथीमुळे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजेच NIV चे पथक आणि जिल्हा शल्य चिकित्सक घटनास्थळी जाणार आहे. या ठिकाणी पाहणी करुन निर्णय घेणार आहे. आरोग्य विभागाने या आजाराच पुढील उद्रेक टाळण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

तर शाळा बंदचा प्रस्ताव

आळंदीमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आणि लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये तपासणी सुरु केली आहे. या ठिकाणी सर्व घरांची तपासणी केली जात आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात दोन नेत्रतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मुलांवर उपचार मोफत केले जात आहेत. आज आढळलेल्या नवीन प्रकरणांची संख्या कमी झाली नाही, तर शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देणार आहे. यासंदर्भातील रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. परंतु मुलांमध्ये आढळणाऱ्या या साथीमुळे पालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.