माझी जात कोणती सर्वांना माहीत, जन्माने जी प्रत्येकाची… शरद पवार यांनी टीकाकारांचे कान टोचले

मी लोकांचे चेहरे बघतो. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. मला भेटायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हे समाधान दिसत होते. 70 टक्के लोक तरुण होते. नवीन पिढी होती. माझ्या आणि त्यांच्या वयात अंतर आहे. तरीही नवी पिढी आली याचा आनंद आहे. नवीन पिढी ज्या सद्भावनेने या ठिकाणी येते शुभेच्छा देते, त्यांच्या भवितव्यासाठी जे काही करायचं ती काळजी माझ्याकडून आणि माझ्या सहकाऱ्यांकडून केलं जाईल, असं शरद पवार म्हणाले.

माझी जात कोणती सर्वांना माहीत, जन्माने जी प्रत्येकाची... शरद पवार यांनी टीकाकारांचे कान टोचले
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 12:49 PM

बारामती | 14 नोव्हेंबर 2023 | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जन्माचा दाखला व्हायरल झाला होता. त्यात त्यांची जात ओबीसी दाखवण्यात आली होती. हा दाखला इंग्रजीत होता. त्यामुळे पवार यांनी जात बदलल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मराठा समाजात दिशाभूल करण्यासाठी करण्यात आलेल्या या प्रकारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदप पवार यांनीच खुलासा केला आहे. माझी जात कोणती आहे हे सर्वांना माहीत आहे. जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपूच शकत नाही, असा शब्दात शरद पवार यांनी टीकाकारांचे कान टोचले आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिवाळी पाडव्यानिमित्ताने आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांच्या जातीविषयी विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. तो दाखला मी बघितला. मराठा एज्यूकेशन सोसायटीचं हायस्कूल आहे. तिथे माझं शिक्षण झालं. तो दाखला खरं आहे. त्यातील जात, धर्म वगैरे लिहिलेल्या गोष्टी खऱ्या आहेत. पण काही लोकांनी दुसरा दाखला फिरवला. आणि माझ्या पुढे ओबीसी लिहिलं. मला ओबीसी वर्गाबद्दल आदर आणि अस्था आहे. पण जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपू शकत नाही. सर्व जगाला माहीत आहे माझी जात कोणती. पण जात याविषयावर मी कधी समाजकारण आणि राजकारण केलं नाही. करणार नाही. पण त्या वर्गाचे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी जो हातभार लावायचा तो मी लावेल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

तरुणांची भावना तीव्र

मराठा आणि धनगर आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकार आणि केंद्राच्या अंतर्गत येतो. काही लोक काल इथे आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते लोक गेले. आरक्षण मिळावं ही तरुण पिढीची भावना तीव्र आहे. निर्णय घ्यायचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारकडे आहे. लोकांच्या या भावना तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही ते करू, असं पवार म्हणाले.

मराठवाड्यातून सर्वाधिक लोक आले

दिवाळी निमित्त दोन दिवसांपासून मी लोकांना भेटतोय. आज सकाळी 7 वाजल्यापासून भेटी सुरू आहेत. मला भेटायला आलेल्यांमध्ये मराठवाड्यातील लोक अधिक आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,कोकण, विदर्भातील काही जिल्हे, पुणे आदी भागातूनही लोक आले आहेत. त्यांनी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. हा सण देशातील सामान्य लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे दीपावली आणि नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं ही इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.