पुण्यात आतापर्यंतची सर्वात मोठी ई-फसवणूक, निवृत्त कर्नलला फसवले

pune cyber fraud : पुणे शहरात फसवणुकीच्या घटना वाढत जात आहेत. सायबर चोरट्यांकडून अनेकांची फसवणूक केली जातेय. सायबर ठगाने काही दिवासांपूर्वी माजी सैनिकाची सुमारे एक कोटीत फसवणूक केलीय होती. आता एका माजी कर्नलची फसवणूक केली आहे.

पुण्यात आतापर्यंतची सर्वात मोठी ई-फसवणूक, निवृत्त कर्नलला फसवले
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 11:02 AM

पुणे : ऑनलाइन फसवणूक करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून देशभरात मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. ऑनलाईन असणारे सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवून फसवणूक करत आहेत. अनेक जण त्यांच्या सापळ्यात अडकताच त्यांची आयुष्यभराची कमाई जात आहे. आता पुणे शहरात एका निवृत्त कर्नलची आयुष्यभराची कमाई गेली आहे. आतापर्यंत शहरात यापेक्षा मोठा ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा घडलेला नाही. सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण एक टक्का सुद्धी नाही.

कशी झाली फसवणूक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल पाटील यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, पुण्यातील बंडगार्डनमध्ये एक ७२ निवृत्त कर्नल राहतात. त्यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये व्हिडिओ लाईक करणे आणि रिव्ह्यू लिहिण्याच्या कामाची ऑफर दिली. सुरुवातीला या कर्नलला पैसैही मिळाले. त्यानंतर या कर्नलला स्वतः गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

सुरु झाली फसवणूक

कर्नल यांना सायबर भामट्यांनी विविध बँकांमध्ये पैसे पाठवण्यास सांगितले. त्यांनी भामट्यांनी दिलेल्या ४८ विविध बँक खात्यांवर पैसे पाठवले. त्यांच्यांकडे असणारी सर्व बचत आणि निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम यामध्ये गुंतवली. यासंदर्भात त्यांनी कुटुंबाशीही चर्चा केली नाही. मग फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

गेल्या चार महिन्यांत पुणे शहरात सायबर फ्रॉडच्या १३९ तक्रारी आल्या आहेत. त्यात तब्बल १५ कोटी ७० लाखांची फसवणूक झाली आहे. परंतु यामधील केवळ एकच गुन्ह्याचा तपास लागला आहे. म्हणजे हे प्रमाण एक टक्कासुद्धा नाहीय.

पोलिसांनी केले आवाहन

पोलिसांनी ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.

पुणे जिल्हाधिकरी रडारवर

सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्याचे सत्र सुरूच आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे फोटो वापरत मागील महिन्यात “माही वर्मा” या नावाने फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा देशमुख यांचे नाव आणि फोटो वापरून बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

हे ही वाचा

सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी? आता पुन्हा काय केले सायबर ठगांनी…

cyber fraud : सावध व्हा, सायबर चोरट्यांनी यांना घातला १६ कोटींचा गंडा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.