EXCLUSIVE | पूजाच्या लॅपटॉपमधील व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती
पूजा चव्हाण प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येतेय. आणि आता तर थेट वनमंत्री संजय राठोडांचे काही व्हिडीओच समोर आलेत. हे व्हिडीओ पूजाच्या लॅपटॉपमधले असल्याचं सांगितलं जातंय (New videos came out from Pooja Chavan Laptop about Minister Sanjay Rathore).
पुणे : पूजा चव्हाण प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येतेय. आणि आता तर थेट वनमंत्री संजय राठोडांचे काही व्हिडीओच समोर आलेत. हे व्हिडीओ पूजाच्या लॅपटॉपमधले असल्याचं सांगितलं जातंय. तसंच जे व्हिडीओ सध्या समोर आलेले आहेत, ते राठोडांच्या निवडणुकीच्या कॅम्पेनिंगचे असल्याचं कळतंय. पूजाच्या लॅपटॉपमधल्या व्हिडीओत काय आहे ? त्याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत (New videos came out from Pooja Chavan Laptop about Minister Sanjay Rathore).
पूजा संजय राठोडांच्या निवडणुकीचं कॅम्पेन करत होती ?
पोहरादेवीत, संजय राठोडांनी पूजाच्या मृत्यूवरुन झालेले आरोप फेटाळले. मात्र आता नवे व्हिडीओ समोर आलेत. आणि हे व्हिडीओ पूजाच्या लॅपटॉपमधले असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे यात, राठोड आणि राठोडच आहेत.
व्हिडीओंमध्ये नेमकं काय आहे?
पूजा चव्हाण, संजय राठोड यांच्या निवडणुकीचं कॅम्पेन करत होती, अशी माहिती मिळालीय. आणि त्याच प्रकारचे व्हिडीओही पूजाच्या लॅपटॉपमधूनच समोर आलेत. संजय राठोड मतदारसंघात फिरत असल्याचे, नागरिकांशी संवाद साधत असल्याचे फोटो आणि व्हिज्युवल्स घेऊन राठोडांचे व्हिडीओ तयार करण्यात आलेत.
भाजप-शिवसेनेच्या युती सरकारमध्येही राठोड मंत्री होते. त्यावेळचे व्हिडीओही हाती लागलेले आहेत. सोशल मीडियावर एखाद्या नेत्यांचा प्रसार करण्यासाठी, जशी गाणी आणि डायलॉग लावून व्हिडीओ तयार केले जातात, अगदी त्याच प्रकारे हे व्हिडीओ तयार करण्यात आलेत.
राठोडांच्या प्रचाराची जबाबदारी पूजाकडे?
या व्हिडीओवरुन सहज लक्षात येण्यासारखं आहे की, सोशल मीडियावर राठोडांच्या प्रचाराची जबाबदारी, एक तर पूजाकडे होती किंवा पूजा कोणाकडून तरी हे व्हिडीओ बनवून घेत असावी, कारण हे व्हिडीओ तिच्याच लॅपटॉपमधले असल्याचं सांगण्यात आलं.
पूजाला राजकारणाची आवड होती हे तर पूजाच्या चुलत आजीनं याआधीही सांगितलंच आहे. आणि आता नवनवे व्हिडीओ समोर येत आहे. संजय राठोड आपण निर्दोष असल्याचं सांगतायत. पण मग पूजाच्या लॅपटॉपमध्ये राठोडांचेच व्हिडीओ कसे? राठोड व्हायरल ऑडिओ क्लीपवरही बोलले नाही. मात्र पूजाच्या लॅपटॉपमधल्या त्यांच्याच व्हिडीओवर त्यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज?
नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत